Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. अलफखान करनुलकर यांजकडून रणदुलाखान येथें आलें. नवाबाची मुलाजमत होऊन, मध्यस्तासीं बोलणें जालें. रणमस्तखान यांची दौलत व करनुल आदिकरून कुल तालुका अलफखान यांजकडे बाहाल असावा. या समंधें नवाबाची नजर दाहा लक्ष व मध्यस्त दरबार खर्च बाबद पांच लाख, येकूण पंधरा लक्ष ठराविले. सदरहु पंधरा लाख रुपये दरसाल येक लक्ष प्रो पंधरा वर्षांत आदा करावे. या प्रो किस्तबंदीचा ठराव जाला. रणदुलाखान यांचें बोलणें मध्यस्तांसी कीं “ टिपुकडून गुलाबखान पेषकसीचे येवजाकरितां करनुलास येऊन तगादा कारतो याचा बंदोबस्त करावा तर सालाचे सालास करार बमोजीब येवज ज्या बज्या होईल टिपु पेषकसीचा येवज घेऊं लागल्यास त्यास परभार देणें, आणि नजरे बाबद इकडेंही येवजाची सरबराई करणें, हें कसे घडेल ?” या प्र।। बोलणें आहे इभ्राइमखान रणमस्तखानाचे वडील पुत्र यांजला प्रथम खिताब व सरफराजी करून येथून करनृल तालुक्याचे बंदोबस्ताकारतां महमद अमीखां आरब यांजकडे रवाना केलें. मागाहून फौज पाठऊन कुमक करावी येसा बेत होता. तो राहून, अलफखानाकडील पैगम लागल्यावरून रणदुलाखानास येथें आणविलें, हें इभ्राइमखान यास समजल्यावरून तेही पाकटुराहून निघाले ते येथें आले. नवाबाची मुलाखत जाली. इभ्राइमखां यांस साठ हजार रुपयांची जागीर यक तालुका द्यावा त्यांत त्याणी आपली गुजराण करावी; वरकड सर्व तालुका अलफखानाकडे, याप्रो रणदुलाखान यांसी निश्चयें ठरून संनदा पत्रें तयार करविली र छ १५ मोहरम हे विज्ञापना.