Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
फ्रेंच पाडले व किल्ला घेतला. किल्ल्यांत बरीच अन्नसामुग्री व इतर दारुगोळा होता तो त्यांस मिळाला, तसेच त्यांनीं बरेच लोक जखमी केले व बरेच कैदी सांपडले. फ्रेंचांचा सरदार जनरल डोंविअर हा हातीं सांपडला व त्याबरोबर बरेच प्रेंच लोक कैद झाले. सियासमलचा किल्ला पडल्याची बातमी कळतांत फ्रेंचांची फार गाळण झाली व लागलीच किल्ला व त्याचे भोंवतालचा मुलूख तसाच टाकून देऊन त्यांनीं पळून जाण्याचा विचार केला. जर्मन बादशहा व प्रशिआच्या राजांनीं ह्या सोडून गेलेल्या किल्ल्यावर आपली छावणी करून तिस-या तारखेला फ्रेंचांचा पाठलाग केला, ह्यावेळीं ५०० लोक मारले, बरेच जखमी व कैद केलै व रणांगणावरून दोन निशाणें व २३ तोफा व बरींच काडतुसें, गोळ्या व अवतंर लढाईचें सामान आणिलें. तसेंच दोन जंगी तोफा व बरींच काडतुसें, गोळ्या व अवंतर लढाईचें सामान त्यांना मिळाले. नंतर मेन्झ् नदीवर त्यांनीं तळ दिला. विजयी सैन्याच्या रिसाल्यानें, पलालेल्या फ्रेंच सैन्यांतले २००० लोक कैद केले, व त्यांचे तोफखानें व सर्व प्रकारची सामुग्री ह्यांच्या हातीं सांपडली. ४ तारखेला ह्या फौजेच्या तोंडावरची टोळी मेन्झ् नदी ओलांडून तंकदर पावेतों ह्या घाबरलेल्या सैन्याचा पाठलाग करीत गेली. तेथें पोहोंचल्यावर फार भयंकर रण माळलें. परंतु राजपुत्र चार्लसचा रिसाला आला नसल्यानें व रत्रहीं। अंधाराची असल्याकारणानें त्यानें तेथेच मुकाम केला. ५ वीला त्यानें कुच केला. तेव्हा त्याला असें दिसून आलें कीं प्रेंच लोक ती जागा सोडून पळून गेले होते, येथेंही त्यांस बराच लढाऊ सरंजाम, व बॅटरी व खजीना मिळाला. तेथें असलेल्या तीन पलटणांचा कांहीं निवडक लोकांनिशी पाठलाग करून यक तोफ व येक निशाण हस्तगत केलें. सेनापति गेलिंगट व एकत्र सैन्याचा सेनापती असे दोघे पुढें पाठलाग करीत जाऊन पेंचांपैकीं बरेच जाया व जखमी करून पुष्कळशी लूट घेऊन आले. ह्या तिन्ही तुकड्या जेव्हां पुन्हां एकत्र जमल्या तेव्हां रोझामंड शहरांत दबा धरून बसलेले फ्रेंच लोक घाबरून तें शहर शत्रूच्या हांतांत सोडून पळून गेले. तेथींल सरदार लोक ह्या विजयी राजाचीच प्रजा असल्यानें त्यांच्या जमामुळें त्यांस फार आनंद झाला; व मध्यंतरी कालानुरोधानें जरी त्यांजवर बंडखोरांनीं आपली सत्ता बसविली होती, तरी ते पळाल्याचें वर्तमान समजल्यापासून प्रत्यहीं सकाळीं ते शहराबाहेर येऊन ह्या विजयी राजांचें अभिनंदन करून व ईश्वराची प्रार्थना करीत असत व कोठेंहीं फ्रेंचांचीं गांठ पडली कीं त्यांस मार देत असत. तारीख ६ मार्चपासन ७ मार्च पावेतों जेथें फ्रेंच लोक कैद करून ठेविले होते तेथून त्यां सर्वांस एक जागीं आणण्यांत आले. त्यांतच जनरल डोंबिअर हा होता कारण तोही कैद केलेल्या लोकांपैकींच येक होता. इंग्रजांच्या दुस -या राजपुत्राला ७००० लोकांचें आधिपत्य मिळाल्यावर डच लोकांच्या मदतीकारितां तो निघाला व वर सांगितलेल्या जागांनां शह दिला. फ्रेंच बंडखोरांच्या कबजांत त्यांचा राजा कैद केलेला होता. त्याच्या लहान मुलाला फ्रान्सचा राजा नेमिलें व युवराजाची व प्रतिनिधीची जागा त्याच राजाच्या वडील भावाला दिली. तसेंच त्याच्याच आणखी एका भावाला मुख्य प्रधान व सरलष्कर नेमिलें. हे दोघे बंधु एकंदर सर्व राजचिन्हांसहित त्यांचे मदतीसाठीं आलेल्या राजास येऊन मिळाले. फ्रान्स देशांतील रोवेन नामक शहरांत ५०००० कामकरी लोक होते, त्यांना बंडखोरांनीं फार छळलें होतें. ह्या लोकांनीं आपली संधि आली आहे असें पाहून जागजागीं जुटी केल्या व बंडखोर सांपडल्याबरोबर त्यांना मार देण्याचा सपाटा चालविला. दुस-या जागींसुद्धां असाच प्रकार चालूं झाला. जणूं काय त्या वेळीं फ्रेंच लोकांत दोन फळ्याच झाल्या होत्या असें दिसूं लागलें. बाकीचे लढाऊ जहाजें व लढाऊ शिपाई तयार करण्याच्या उद्योगाला लागले. पांचवे तारखेस इंग्लंडच्या राजाला इस्तंबोलच्या सुलतानाकडून बातमी लागली कीं, फ्रेंचांनां शासन करण्याकरितां इंग्रज ओकोडेल याचबरोबर ७० पासून १०० तोफा पाठविल्या जात आहेत. १६ तारखेला इंग्लंडच्या राजाकडे तुर्कस्थानच्या सुलतानाकडून निरोप आला की २५ मोटीं लढाऊ जहाजें तयार करून आपले सरदाराबरोबर फ्रान्स देशांत लवकरच पाठविली जाणार आहेत, कील नांवाचे शहर तेथील लोकांवर जुलुम करून फ्रेंच लोकांनीं गेल्यावर्षीं घेतलें होतें व तेथील लोकांपासून जबरीनें बंडवाल्याशीं प्रामाणिक पणानें वागण्याबद्दल शपथा घेतल्या होत्या. परंतु ता० ७ व ८ रोजीं तेथील सर्व लोक एकदम “ जर्मन बादशहा दीर्घायु होवो, फ्रेंचांचा त्याचे हातून पाडाव होवो” असा घोष करीत त्यांनीं फ्रेंचांवर हल्ला केला व काठ्या आणि कु-हाडीं यांनीं त्यांस बराच मार देऊन बाहेर हांकून लाविलें फ्रेंचांना त्यापुढें टिकाव धरतां येईना; आणि ह्मणून आपलीं निशाणें वगैरे तशींच टाकून देऊन त्यांनीं पळ काढला. अशीच स्थिती कोलसबाद येथें झाली.