Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें कीं::-“चिनापटणाकडोन अखबार आली त्यांत वर्तमान कीं::-‘फूलचरीवर चिनापटणचा गौरनर सवीस पलटणे गोरे पगडीवाले सिवाय तोफा दोनसें इतक्या मजबूत सरंजामानसीं जाऊन इरादा केला. प्रथमतःच फलचेरीवर गोळे षुरु केले. येक लडाई याप्रमाणें होऊन त्याजवर जंगमजा केलें आणि फरासीसाकडोन अधिकारी फुल चेरी येथें आहे त्याजके इंग्रजीकडील गौरनरानें आपले पुत्रास किल्यास पाठविलें. निरोप सांगून पाठविला कीं::-- इंग्रज व फरासीस या उभ येतां मध्यें लडाई परदेशीं जाली असतां मागील कायदा असा आहे कीं:- ‘ लडाईंत पाडाव माणसें इंग्रजांकडील फरासीसाकडे अथवा फरासीसाकडील इंग्रजापासीं आल्यास त्यांस मारहाण न कारतां येहतीयातीनें ज्यांची त्याजकडे घ्यावी, त्यास आमची जमयेत सवीस पलटणें व तोफा वगैरे सरंजाम या प्रकारचा; तुह्मांपासीं कुल जमयेत दोन अडीस हजार.यास्तव लढाईचा इरादा न करतां मकान खाली करून घ्यावें. तुह्मीं चजिबस्त सुद्धां निघोन जावें. हें न कारतां जंग करावी असाच मनोदय असल्यास तोफा लाऊन येक येक सफीलव बुरुज मोकळा करून देऊं. त्यासमई मकान हस्तगत झाल्यानंतर तुह्मीं ह्मणाल कीं इंग्रज फरासीसाचा कायदा पाडाउ यांस सोडावें तरी ते कबूल होणार नाहीं. येविसीं आताच तुह्मांस बज्याउन सांगतो. लढाई होऊन तुह्मी हस्तगत जाल्यानंतर आह्मांस कतल करणें प्रात्य. इतका विच्यार पुर्तेपणें दूरदेशीनें समजोन याचा जवाब मामुल पाठवावा. याप्रो निरोप गेला. अद्याप याचा जवाब कांहीं आला नाहीं, याप्रो एक अखबार आली. त्यांत वर्तमान दुसरें ऐकण्यांत आहे, कीं इंग्रजाचें गौरनरानें सदरहु प्रो फुलचेरीचे फरासीसास सांगून पा. याचा जबाब फरासीसानें इंग्रजासी योजिला आहे कीं आमची जितकी फरासीसी जमियेत व तोफा वगैरे बार सरंजाम आहे तितकाच सरंजाम जमियेत, व बार इंग्रजी आमचे मुकाबिल्यास घेऊन यावें. तुमची आमची लढाई हौऊन ज्याची सिकस्त होईल यानें फुलचरी मकानापासोन हातउचलावा. याप्रो ही वर्तमान आहे. याजवर यांचे त्यांचे लडाईची बातमी दुसरी अद्यापि आली नाहीं. याप्रो मध्यस्त बोलिले. र। छ १५ मोहरम हे विज्ञापना.