Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण ब. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, नवाबांनीं मध्यस्ताजवळ असतां आह्मीं बोलण्यात आणिलें कीं “टिपुसीं तीन सरकारचा तह पटणावर जाला ते समई करनूलकराकडील पेषकसीचा जाबसाल टिपूकडील मातबरांनीं बोलण्यांत आणिला, त्या समईंची माहितगिरी तुह्मांस सर्व आहेच. करनूलकर समंधी माहीतगिरि तुह्मांस सर्व आहेच, करनुलकरसमंधी जाबसाल तहनाम्यांत ते वख्तीच उगवावा यैसे लाडांसी बोलण्यांतही आलें; परंतु, लाडबाहादुर यांनीं सांगितलें कीं तहनाम्यांत हें कलम उगवावें यैसें आज ह्मटल्यास टिपुनें अगर कबुल केलें तर उत्तम; कबूल न केल्यास हरकत होईल. त्यापक्षीं जो जाबसाल तहनाम्यांत उगवावा येसा इकडील सवाल असतां त्यानें न कबूल करणें यांत काय राहिलें ? " इत्यादिक अंदेशे समजोन बोलण्यांत मात्र जाबसाल आला कीं " रणमस्तखान यांचे मोहरी दस्तायेवज पेषकसीचा निघाल्यास मंजूर, दस्तायैवज निघत नाहीं त्यापक्षीं हा जाबसाल मंजूर नाहीं. या प्रा गुलामअली व रजाअली टिपुकडील मातबर यासीं इंग्रजांकडील मिस्तर किनवी व आम्हांकडून मीर आलम व राव पंतप्रधान यांचे तर्फेनें तुम्हींच होतां. तीन सरकारचे वकीलाच जाबसाल सदरहू प्रा असतां त्या समंई रणमस्तखानाचा मोहरी दस्तायेवज निघाला नाहीं. पुढें पटणाहून कुच जालें; हा जाबसाल मुलतवी राहिला, सांप्रत टिपूकडून गुलाबखान करनुलास येऊन पेषकसीचा तगादा लाविला आहे. याजकारितां लाडबहादूर यांस पत्रें देऊन करनुलकराकडील सादुलाखान चेनापटणास गेला; अद्याप तेथेंच आहे. लाडबा हदूर याजकडील जबाब की “दस्तायेवज निघे। अगर नसो. टिपुसुलतान करनुलकरास पेषकसीचा तगादा करतील त्यास मुजाहिमत नव्हती. व तालुकियांत आपला दख्खल होऊं नये येसे म्हणणें " त्यास पेषकसीचे जाबसालाची शर्त रणमस्तखान याचे मोहरी दस्तेयवजावरील करारांत असतां. लाडबहादूर या प्रा म्हणतात. ताजुब आहे. त्यास पेषकसीचे झटनिवारण करणें हे राव पंतप्रधान यांनीं व आम्हीं याचा उद्योग केल्याशिवाय घडत नाहीं. यास्तव येविषंई लाडसाहेबास पत्रें आमचे व राव पंतप्रधान यांजकडील या प्रो जाऊन पहिला करार ठरल्याबमोजीव दस्तायेवज बजीनस असलियास मुजाका नाहीं. दम्तायेवज नसतां जबरदस्तीनें पेषकस घेणें हें सलाह नाहीं यास्तव हा कचा मार तुम्हीं राव पंतप्रधान यांस लिहून सदरहू अन्वये बंदोबस्ता प्रकर्णी लाड बाहदूर यांस पत्र आणावावें ह्मणोन बोलण्यांत आलें " त्यास त्यांनीं मसोदा दिल्यानंतर सेवेसीं खाना करीन. राछ १५ मोहरम हे विज्ञापना.