Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
२ चिनापट्टन येथील व्यापा-यांना आलेल्या पत्रावरून युरोपांतील आलेल्या बातमीचें भाषांतर
डच लोकांनी फेंचाचे वर्चस्व कबूल केल्यावर त्यांनीं आपल्या कोठी ( कारकान्या ) वर फ्रेंचांचें निशाण रोंविलें, इंघ्लंच्या राजाची बहीण व तिचा मुलगा यांनीं फ्रेंचांशीं मैत्री केली व दोन तीन ठिकाणीं त्यांचें स्वा मित्व त्यांनीं कायम केलें. इंग्रजी सैन्य त्यांच्या देशांतील किना-याच्या प्रदेशांत तयार आहे. व फ्रेंच सैन्य त्यांचे बाजूला तयार आहे. इंग्लंडमध्यें हिजरी सन १२०७ शाबानच्या १७ वे तारखेस लिहिलें.
३ ते सर्वांत पवित्रतम व श्रेष्ठतम आहे; तोच क्षमा करील.
ता. ६ झीलहज्ज अलहराम सन १२०७ हिजरी.
युरोपांत व या देशांत इंग्रज आणि फ्रेंच यांचे दरम्यान झालेल्या लढाईची बातमी किंवा बेलचारी घेण्याचा इग्रजांचा उद्देश अगर इंग्रजांनीं कांही जहाजें धरली ह्या बातम्या आपल्यास पोंचण्याचे पूर्वी ४५ दिवसाचे प्रवासांतच येथें पोंचलेलें यूरोपांतून येक जहान आलें आहे तें चिनापट्टणास लागलें व त्यानें आणिलेंलीं कांहीं पत्रें येंथें देऊन तें कलकत्यास रवाना झालें. बेलचारीला वेढा घालून तें घेण्याविषयीं युरोपांतून हुकुम आला असल्यानें चिनापट्टन येथील लोकांनीं कदलूर व देवपट्टन ह्या त्यांच्या जुन्या ठाण्यांकडे ५००० बारा (पलटणें-बंदुकावाले–किंवा, भारवरदारी-पान १५ टीप-पहा ) ३००० शिलेदार, तोफा दारूगोळा व लढाऊ सामान व वेढा देण्याला उपयोगी पडणारें बरेंच सामान रवाना केलें व आणखीही बरेच लढाऊ सामान लवकरच जाईल. त्यांचा इरादा असा दिसतो कीं वरील जागीं फौज व सर्व सामान व वेढ्याची सर्व तयारी जय्यत ठेऊन तेथून सर्वांनीं एकवटून हल्ला करायचा व अशा रितीनें अल्पकाळांत वेढा द्यायचा. फ्रान्स देशांतून बेलचारी येथील लोकांस असें आश्वासन आलें आहे की लवकरच १८ जहाजें, तोफा, बंदुका, शिपाई-दारूगोळा व इतर लढाऊ सामानासहित पाठविलीं जात आहेत. परंतु ते येईपर्यंत त्यांनीं आपलें नांव राखावें व सदर ३ शहराचें उत्तम रितीनें संरक्षण करून तें राखण्याचा त्यांनीं प्रयत्न केला पाहिजे. लागलीच त्यांनीं ४ जहाजें ३०० शिलेदार, दारुगोळा व सामानसह बेलचडी येथें रवाना केलीं. परंतु हवेंतील ऊष्णतेमुळें व दुखण्यामुळें त्यापैकीं बरेच लोक मेले आणि मुकामाला फारच थोडे येऊन पोहोंचले. हल्लीं बेलचडीच्या किल्यांत २५०० पेक्षां ज्यास्त लढाऊ युरोपिअन नाहींत. व असेंहीं समजतें की तटबंदीवरून मारा करण्यासारख्या मोठ्या तोफांसुद्धां तेथें नाहींत. बेलचडी शहरांत असा जाहीरनामा फिरला आहे की फक्त ज्यांजवळ तीन महिन्याची सामुग्री असेल त्यांनीं राहावें व बाकीच्यांनीं चालतें व्हावें. पोर्तुगीझ लोक इंग्रजांनां मिळाले आहेत, आणि स्पनिश व जेनमार्कचे लोकांची फ्रेंचांना मदत आहे. नुकतेंच त्यांनीं तांदुळांनें भरलेलें फ्रेंचांचें येक जहाज लुटलें आणि त्यावरील सरदाराला मछलीपटणास कैद केलें, अशी बातमी आहे कीं, कलकत्याहून लार्ड कार्नवालिस येऊन सदरहू फ्रेंच प्रकरणावर स्वत: नजर ठेवणार आहे. इंग्रजी कंपनीबरोबर सलोखा राहावा या हेतूनें फते अलीखान तोफखान्यांच्या बैलाच्या तयारींत आहे. यानंतर जें जें होईल ते आपल्यास कळविलें जाईल. जास्त काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.