Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. मध्यस्तांनीं बोलण्यात आणिलें कीं “राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांजकडील जाबसाला चा भाग तुटत नाहीं. जानोजी भोंसले व सेनाधूरंधर यांचे काराकिर्दीस दुतर्फा तहनामें जाले त्या बमोजीब परस्परें वहिवाट व्हावी तें न होतां सेनासाहेब सुभा यांची आगळीक होते. वराड प्रांतीं बेमोईन जेथें जसा दस्त पोहचतो तेथें अमल घेण्यास देसा देश करीतच नाहींत. यांचे जाबसाल आज रुपें वाजवी ठरावें ये विसी तुम्हांसी किती वेळ बोलण्यांत आलें ? तुम्हीं ही त्यांजला जे पर्यायै लिहिण्याचे ते लिहिलेच असतील. पटणचे स्वारीहून येते समंई हरी पंडत यांसीही सर्व दर्जे बोलण्यांत आले, परंतु अद्याप कोणचाही मुजकाः होत नाहीं. त्याजकडोन विठ्ठलपंत सुभेदार बारा हजार फौज तोफा वगैरे सरंजाम घेऊन जडसी बाम्हणी वगैरे तालुकियांत सरहादेवर आले. गावेलगडावर तोफा नेऊन बंदोबस्ती केली इत्यादि वर्तमानेंही पेहम येतात; त्यास वाजवी जाबसालाचीं कामें बोलल्यानें उलगडायाची, त्यास फौजा पुढें ठेवणें व बंदोबस्त करणें याची सबब काय ? सेना साहेब सुभा सरदार आहेत. त्याजपासीं फौजेचा सरंजाम कमाल तीस हजारपर्यंत कामाचे वख्ती हें महषूर आहे, त्यापक्षीं दाहा बारा हजार फौजेनसी सुभेदार पुढें आल्यानेंच त्यांजपासीं फौज आहे हें समजावें येसे नाहीं, तर्फेचे तहनाम्या प्रो जाबसाल विल्हे लागावें. या सरकारचे जाबसालाचा फैसला त्याजकडोन व्हावा. त्याचेही जाब पाल इंदूर, बोधन वगैरे माहाला घा। दाण्याचा व प्रांत गंगथडी येथील वाक्या राहिल्या म्हणतात याचे उलगडे होऊन दुतर्फा करार बमोजीब अमलांत आणावें हें चांगलें. आतां ही दस-या पावेतों त्याजकडोन कोण्ही मातबर मुख्तियार भवानी काळो अथवा श्रीधरपंत आगर कुशाबा चिटनीस या तिघांतून येकानें येऊन तडजोड करावी हे सलाह. नके जो जाबसाल आतां जसा उलगडण्यांत येईल, तोच दसरा जाल्यानंतर करीन म्हटल्यास कठीण पडेल, तहनाम्याचे रुईनें जाबसाल विल्हे लागावे असें म्हणत असतां, या जाबसालास कोण्हीही गैर वाजवी म्हणार नाहींत, याचाही विच्यार असावा. येविसीं सेना साहेब सुभा यांस तुम्हीं येक वेळ ल्याहावे” याप्रो मध्यस्ताचे बोलण्यांत आलें. ध्यानांत यावें यास्तव विनंती श्रीमंताचीही आज्ञा सेनासाहेब सुभा यांस जाऊन तिघांपैकीं येकानें इकडे येऊन जाबसालाचे भाग तोडावे, येविसी सरकारांत तुम्हीं ळिहुन उत्तर लौकर आणवावें " ह्मणोन बोलिले त्यावरून विनंती असे. आज्ञा येईल त्याप्रो यांसी बोलण्यांत येईल. ॥ छ १५ मोहरम हे विज्ञापना.