Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

सातारा.

हा शब्द सितारा ह्या फारशी शब्दापासून निघाला असावा असें अनेकांचें ह्मणणें आहे. माझ्या मतें, हा शब्द शुद्ध मराठी आहे. सध्याच्या साता-याच्या दक्षिणेस सातें ह्मणून एक गांव आहे, त्याच्या जवळचा जो दरा तो सातदरा. ही सातदा सातारा किल्याच्या दक्षिणेस ऊरमोडीच्या पलीकडे जो डोंगर आहे त्याच्या कुशींत आहे. जुना सातारा ह्मणून ज्याला ह्मणतात तें गांव व तो दरा येथेंच होतें व आहे. पुढें महा द-याच्या जवळ जुन्या साता-यांतील लोकांनीं येऊन वस्ती केली, तेव्हां त्या वस्तीला सातारा हें नाव पडलें. मराठी सातारा व फारशी सितारा हे शब्द एका वेलांटीनेंच तेवढें भिन्न असल्यामुळें व फारशींत सतारा व सितारा हे दोन्हीं शब्द एकाच अक्षरांनीं लिहित असल्यामुळें, सातारा हा शब्द सितारा ह्या फारशी शब्दाचा अपभ्रंश असावा, असा तर्क निघाला. परंतु, मुसुलमानांचें आगमन महाराष्ट्रांत होण्याच्या पूर्वी सातदरा ऊर्फ सातारा अस्तित्वांत असल्यामुळें, हा तर्क निराधार आहे हें उघड आहे.

पेण.

प्रकीर्ण ह्याचें प्राकृत पइण्ण. प्रकीर्णग्राम=पइण्णगाम=पेण्णगांव-पेण जेथील घरें मूळचीं दूर दूर होतीं तें पेण गांव.

वसई
.

सं. वसति=प्रा. वसइ.

पैठण.

फलस्थान=फलठाण=फलटण. मल्लस्थान-मालठाण=मलठण, बिंबस्थान= बिंबटाण=ठाणें. प्रतिस्थान=पइठाण=पैठण. पट्टन ह्या शब्दाशीं पैठणाचा काहीं एक संबंध नाहीं.