Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

धणीचाबाग.

साताराशहरांत पहिल्या शाहु महाराजांच्या वेळेपासून छत्रपतींचे कांहीं बाग आहेत. पैकीं एका बागाला धणीचाबाग ह्मणतात, व एका विहिरीला किंवा चिरेबंदी जल विहाराच्या जागेला धणीची विहीर म्हणतात. धणीची बाग व धणीची विहीर म्हणजे कोणाचा बाग व कोणाची विहीर म्हणून कित्येक लहान मोठ्या माहितगार लोकांस विचारतां समाधानकारक उत्तर मिळत नाहीं. कोण ह्मणत, धणी ह्मणजे धनी अर्थात् छत्रपति. परंतु धनी शब्दांतील नीचीणी कशी झाली तें कोणी सांगेना, कोणी ह्मणत धनीण ह्या शब्दाचा अपभ्रंश धणी असावा. त्यांच्यां मतें धनिणीचा बाग ह्याबद्दल धणीचा बाग असा जलद बोलण्यानें अपभ्रंश झाला असावा. ही व्युत्पत्ति खरी मानण्याला एक अडचण येई. ती अशी कीं ह्या बागेंत शाहूच्या राण्या रहात नसून एक सुस्वरूप नाटकशाळा रहात असे. राण्या रहात असल्या तर धणी म्हणजे धनीण ऊर्फ राणी असा अर्थ करतां आला असता, तेव्हां धणी ह्या शब्दाचा दुसरा कांहीं तरी अंर्थ असला पाहिजे. धणी हें विशेषनामहि नाहीं, अर्थात्, धणी हा शब्द आधुनिक मराठीं भाषेतून बहुतेक लुप्त झालेला असला पाहिजे व त्याचा पत्ता चार पांचशें किंवा नऊ दहाशें वर्षांपाठीमागें काढीत गेलें पाहिजे. निर्णयसागर छापखान्यांत छापलेल्या प्राकृत पिंगलसूत्रांच्या ६४ व्या पृष्टावर खालील श्लोक आहे.

प्राकृत.

रे धणि मत्तमअंगजगामिणि, खंजणलोअणि, चंदमुहि, । चंचल जुव्वण जात ण आणहि; छइल्ल समप्पइ काँइ णहि ? ॥

संस्कृत.

रे प्रिये मत्तमतंगजगामिनि, खंजनलोचने, चंद्रमुखि, । चंचलं यौवनं जातं न जानासि; विदग्धेभ्यः समर्पयसि कुतो नहि ? ।।
त्यांत धणी ह्या शब्दाचा अर्थ वारयोषित् आहे. हाच धणी शब्द साता-यांतील धणीचा बाग व धणीची विहीर ह्यांच्या मालकिणीला लागलेला अद्यापही। ऐकूं येतो.