Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

कान्हेरी, कण्हेरी, कण्हेरखेड कानगाव

कन्हगिरीचा अपभ्रंश कन्हेरी, कान्हेरी, कण्हेरी, कण्हेरी हे गांव वाईच्या उत्तरेस असणा-या मांढरदेवीच्या डोंगराच्या पूर्वेस दोन कोसांवर व शिरवळाच्या दक्षिणेस दोन कोसांवर आहे. येथें डोंगरांत एक विहार आहे. त्याचें तोंड एका प्रचड शिलेनें कोंदलें आहे. आंत खोल्या, तळें वगैरे आहेत ह्मणून वृद्ध सांगतात. कण्हेरी येथील रामदाशी मठाचे मूळ संस्थापक वासुदेवबोवा-रामदासस्वामीचे शिष्य---ह्या गुहेंत तपश्चर्या करीत असत.

खंडाळें, खिंडाकें.

महाराष्ट्रांत खंडाळीं पुष्कळ आहेत. खिंडतल, खंडतल, खंडअळ, खंडाळ, खिंडाळ, अशा परंपरेनें हा शब्द आला आहे. खिंडीच्या तळचें किंवा माथ्यावरचें जे गांव ते खंडाळें.

पंढरी.

गांव व भोंवतालील शिवार ह्यांना पंढरी व काळी अशा संज्ञा महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहेत. गांवांतील घरठाणाची जेवढी जागा तेवढी पांढरी; व शेतें, कुरण, वगैरे सर्व काळी. पंढरीस मूळची कोट्यांची वस्ती दहापाच घरांची होती. ह्मणून तिला मुळीं पंढरी अथवा पांढरी ह्मणत, जेथें सध्या विठोबाचें देऊळ आहे तेथें पूर्वी शेतें होतीं. ह्या काळींचा जो देव त्याला काळ्या ह्मणत. ह्याच काळ्याला सान्निध्यानें पंढरीचा राणा ह्मणू लागले. ही माहिती एका वारक-यानें दिलेली आहे.