मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि, नानांची पत्रें छ २१ जिल्कादचे तेरखेची छ २१ जिल्हेजीं तुम्हीं रवाना केलीं, याचें बहुत आश्चीर्य जालें. इतके दिवस पत्रास कां लागले याचें कारणही तुम्हीं लिं नाहीं. नानापासींच पत्रें इतके दिवस राहिलीं असें ह्मणावें तर येक तेरखेस सर्व पत्रांवर विनंत्या जाल्या. तेव्हां पत्रें आपल्यापासीं कशास ठेवितील ? तस्मात् तुह्मापासीं पत्राचा लाखोटा दिल्हा तो कोठें गैर विल्हेस पडला होता. तो जेव्हां सांपडला तेव्हां पाटविला. ऐसें मनांत आलें. त्यास हें राजकारणाचें काम. नाना यांजकडील पत्राचेकडें आमचे नेत्र असतात. पत्राचे जाब आल्यावर त्या आज्ञेप्रा येथें बोलण्याचीं धोरणें चालतात. हे प्रकार तुह्मांस समजत नाहींत ऐसें नाहीं. परंतु आलस्यामुळें विस्मृति होती. येविषंई तुह्मांस तेथें रागें भरून सांगावें असें कोणीं नाहीं. याजकरितां राजश्री नानाचे पत्रांत तुमचा गिला लिहिला आहे, याजमुळें तरी काळजी धराल, त्यास इतःपर असें घडूं नये. पत्राचे जाब लिहिण्यासही तुह्मांसीच देतात. असें असतां इतके दिवस लागणें हें तुमचें कालहरण. परराज्यांत आह्मी राहिलों. येथें व्यवहार सर्व तिकडील पत्रावर, जर पत्रें लौकर न येत तर कसें करावें ? त्यास या पत्राचें येकदां दोनदां मनन करून काळजी ठेवावी. ॥ छ, १६ मोहरम. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries