मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
अधिक वैशाख वद्य १ शनिवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री

बळवंतराव व्यंकटेश राजे कृपावंत बाहदुर सुभा औरंगाबाद स्वामीचे सेवेसी.

पौ सखो जिवाजी कारकून नि। सरकार कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरी नवाब निज्याम आलीखान बाहदुर यांनीं सरकारचे यैवजाच्या तनखा। तुह्मावर दिल्ह्या त्याचे यैवजीं येथें खर्चास पावलें ई छ १ माहे रजब ता। छ १५ रमजान पावेतों यैवज पावला तो रुपये ५००० पांच हजार पावले असते. या पांच हजारां पौ। राजश्री नारायणराव भवानीदास वकील यांजजवळ तुमचें नांवची पावती साडेतीन हजाराचा आलाहिदा छ ४ शाबानची आम्हीं दिली आहे ते रद असे. सु॥ सलास तिसईन मयां व अलफ, छ १५ रमजान सन १२०२ बहुत काय लिहिणें? हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries