मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ़ वा १० गुरुवार शके १७१५.

विनंति. उपरि तनखाचे यैवजापैकीं एकंदर वसूल सुभ्यांनीं नावाबाकडे लिहिला येक लक्ष येकावन हजार दोनसें रुपये सेवा तेरा आणे. पैकीं तनखादारास वसूल सोळा हजार आठसें पंच्याणव रुपये सवा चौदा आणे दिल्हा ह्मणून लिहिलें. परंतु सदरहु ऐवजाची रसीद नाहीं. तेव्हां आह्मीं मध्तस्तासी बो (ल) लों कीं हा यैवज वसुलीं मजुरा पडणार नाहीं. याची रसीद नाहीं त्यापक्षीं यैवज कोणास पावला ? मजुरा काय ह्मणोन द्यावा ? याजवरे मध्यस्त बो(ल)ले कीं आपलें पत्र अहसनुदौलास निक्षूण देतों. सदरहू यैवज श्रीमंताकडून वसुलास आले असतील त्यांस दिल्हा असल्यास रसीद दाखवावी. रसीद नसल्यास फडच्या करून देणें. याप्रा बोलून अहसनुदौलास पारसी पत्र मध्यस्तांनीं दिल्हें, तें पा आहे. हें पत्र त्यांजकडे पाठवून यैवज दिल्हा असल्यास उत्तम. पावला नसतां अहसनुदौलाकडून फडच्या करून घ्यावा. र।। छ २३ जिल्हेज हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries