Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति. उपरी तनखापैकीं बाकीचे यैवजाची चिठी औरंगाबादेवर जगधनाचे दुकानची दोन महिन्याचे मुदतीची पाठविली. येविपीं राजश्री नाना तुह्मास ह्मणतील कीं तनखाचे यैवजास इतके दिवस जाले, आतांही मुदतीची चिठी घेण्याचें कारण काय होतें? त्यास मध्यस्त सदरहू मुदतीचा चिठी देऊं लागले तेव्हां आह्मी बोललों कीं तनखा आपण दिल्हा. त्याचे हप्तबंदीच्या मुदती कशा ? आणि सुभेदारांनीं यैवजाचा फडच्या अद्याप न केला. हलीं यैवजास वायदा न करितां नगदी फडच्या करून द्यावा. याजवर मध्यस्ताचें म्ह(ण)णें की हे चिठी बंतरीक हुंडी आहे. दोन महिन्यांची मुदत कांहीं विशेष नाहीं. येविषीं मदारुलमहाम यांस माझे तरफेनें तुझीं लेहून जरूर सदरहूप्रा। करावें. मुदतीस नेमाप्रा नगदी यैवज दुकानीतहून जगधनाचे घ्यावा. याप्रा दाट रदबदली बहुत कांहीं केली. त्यास विचार पाहतां मध्यस्त दोन महिन्यांचे मुदतीची चिठी देतात. येविषंई इकडून लेहून राजश्री नाना यांची आज्ञा आल्यावर करावें तरी पत्रें जाऊन तिकडून जाब येणें, त्याजवर यांसी बोलणें या खालेंच महिना पंधरा दिवस जातात. त्याजवर यांची चिठी घेऊन औरंगाबादेस पोंहचणें याचा आरसा पाहतां तितकेंच पडतें; बोलण्याचालण्याखालेंच दिवसगत लागोन सरकारी यैवजास लांबण पडती; हें समजोन सेवटीं मध्यस्तास सांगितलें कीं औरंगाबादेस चिठी पावल्यानंतर दोन महिन्यांची मुदत यैसें आपलें ह्म(ण)णें हें तर सहसा कबूल होणार नाहीं. चिठी पोंहचतांच फडच्या व्हावा. तेव्हां मध्यस्तांनीं ठराऊन नेम करून सांगितलें कीं चिठी पावल्यावर मुदतीची शर्त नाहीं. आज छ २० जिल्हेजपासोन दोन महिन्यांनीं यैवज फडच्या करून घ्यावा. याप्रा होऊन जगधनाचे दुकानची चिठी ई छ २० जिल्हेजपासून छ २० सफर दोन महिन्याचे मुदतीनें सदरहू यैवज फडच्या करून द्यावा यैसी घेऊन पा आहे. सदरहु अन्वयें तुंह्मी विनंति करावी. सरकारांतून चिठी औरंगाबादेस रवाना करून करारबमोजीव यैवजाचा फडच्या करून घ्यावा. दोन महिन्यांचे वायद्याचें कारण जगधन याचे दुकानांत यैवज थोडा. दोन महिन्याचे मुदतींत त्याजकडे भरणा होईल. चिठीस दिकत न पडावी याजकरितां इतकें बोलणें ह्मणून मध्यस्त बो (ल) ले. र॥ छ २३ जिल्हेज हे विनंति.
पु राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेसी,