Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ शु. ७ सोमवार शके १७१५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

पो गोविंदराव कृष्ण सां। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि। जावें. विशेष, राजश्री रंगो प्रल्हाद नि।। सरदेशमुख यांचे मामलतीचा ऐवज ता। सन १२०१ पावेतों. त्यापैकीं साडे सतावीस हजार आह्मीं नगदी वसूल येथें सखाराम अनंत नि।। मारनिले यांस दिल्हा. पन्नास हजार रुपयाची चिठी, तुह्मी तेथें मंत्रीस मारनिलेचे मामलतीबाबत, राजश्री हरिपंत तात्या यांची देविली तो ऐवज अद्याप पावला नाहीं. ह्मणोन रंगोपंत यांजकडील पत्रीं बोभाट आला. त्यास चिठी देऊन फार दिवस जाले. अद्याप ऐवज पटला नाहीं. याचें कारण काय येविषीं तात्या यांस विनंति करून ऐवज यांचा यांस पावता जाल्यांत पेंचांतून मोकळे होतील. येविषीं पेशजी ही ऐक दोन वेळा लिहिलें. त्यास सदरहुप्रा यांजकडील मामलतीसमंधें ऐवज पावे तें करावें. यासिवाय माहालींही वसूल मारनिलेकडें पावला त्याच्या रसीदा आल्या. पन्नास हजारांचा भरणा जाला ह्मणजे यांजकडील उलगडा होतो. यास्तव लिहिल्याप्रा। घडवावें. रा। छ. ६ जिल्हेज बहुत काय लि।? लोभ किजे. हे विनंति.

छ, ७ रोज टपा रवाना
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे शेवेसी.

विनंति. उपरि इकडून पत्राच्या रवानग्या पैहाम बहुत जाल्या. त्याचीं उत्तरें फार येणें तीं यावीं. सांप्रत रावरंभाप्रकर्णी वगैरे मा।र अलाहिदा लिहिल्यावरून कळेल. वरकड इकडील वर्तमान राजश्री नाना यांचे पत्रीं लिहिलें आहे त्यावरून समजेल. वरचेवर पत्रें पाठऊन वर्तमान लिहित जावें. रा। छ ७ जिल्हेज. हे विनंति.
पु।। राजश्री गोविंदराव स्वामीचे शेवेसी.

विनंति, उपरि राजश्री रावरंभा यांस माहवारीचा ऐवज येथें साहा हजार रुपये नगदी देऊन दरमहा अकरा हजाराचे दोन रोखे, करमाळ्यांत दोन हजार व कर्जा बाबत वजाई तीन हजार, याप्रा घेण्यांत आले. त्यास सांप्रत मोहरमचे खर्चाकरितां माहवारीसिवाये सात हजार रुपये द्यावे याप्रमाणें राव रंभा यानीं आह्माकडें सांगोन पाठविलें. याचें उत्तर आह्मीं केलें कीं माहवारी सिवाये ऐवज मिळावयाचा नाहीं. बेदरचे स्वारीस निघते वेळेस माहवारीखेरीज च्यार हजार रुपये नवाब आज मुलउमरा बाहादुर यांनीं सांगितल्यावरुन दिल्हे तेच ज्याजती. ऐसे असतां मोहरमचा ऐवज देण्यास जागा नाहीं, याप्रों साफ सांगितल्यावरून बाजी आजमुल उमराबहादुर यांजकडे जाऊन त्यांस सांगितलें. त्यांनीं बजाजीपंतास विचारलें कीं पहिले मोहरमचा ऐवज देण्याची चाल कसी आहे ? यानीं सांगितलें कीं माहवारी पांच हजार पाहेली होती ते समंई मोहरमचे खर्चास माहवारीशिवाये देण्यांत आले. दाह हजार माहवारीचा नेम ठरल्यापासोन मोहरम बाबत खर्च माहवारीचे पोटीं. पेशजी साल गुदस्तां मोहरमाकरितां ऐवज, पटणचे स्वारींत कर्ज दिल्हे तो ऐवज माहवारींत वजा करून घेत आलो. याप्रमाणें सांगितल्यावर बीजीचें ह्म(ण)णें की सात हजार कसेही करून माहवारीसिवाये द्यावे तर निभाव. तुर्त साहा हजार ऐवज नगदी माह:वारीचा येतो. यांत मोहरमाबाबत वजा केल्यास खर्च कसा चालेल? याप्रा। बाजाही. (?) तेव्हां मध्यस्तानीं तोड सांगितली कीं पांच हजार रुपये मोहरमाकरितां तुह्मास देवितों; सातहजार मिळणार नाहींत. याप्रा करून आह्मांकडें मध्यस्तानीं सांगोन पाठविलें कीं रावरंभा यांस मोहरमचे खर्चास पांच हजार रुपये आपण द्यावे. गोविंदराव यांस लिहावें. त्यांनीं माहवारीसिवाये मोहरमाबाबत द्यावे ऐसें लिहिल्यास दिल्हेच आहेत. कदाचित माहवारीचे ऐवजीं दरमाह एक हजार वजा करून घेत जावें ऐसें लिहिलें आल्यास तसें कारितां येईल. तूर्त दिवस मोहरमचे. साहित्य जालें पाहिजे. यास्तव पांच हजार द्यावे. त्यावरून बाजीचा रोखा घेऊन पांच हजार रुपये दिल्हे. रा। छ. ७ जिल्हेज. हे विनंति.