Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.
विनंति उपरि. बाळाजी व्यंकटेश व येमाखिदमतगार आला तो कारभार ठरला. दस्तक हुजरे सिंध करवितों. गुजराथ प्रांत नेमांत; परंतु श्रीमंताचे म्हणणें मावळही खांचर आहे. चिंता नाहीं ! याची भवति न भवति होऊन उदईक तें लिहीन. सारांश करावें ऐसें जालें. आपण निशा घेतली असेल तो ऐवज हस्तगत होये ऐसें करावें. इकडून कार्य जालें. तिकडे दिकत न पडावी याचा विच्यार करून उत्तर आधीं यावें. उत्तर आलियावर दस्तक हुजरे देऊन सेमास पाठवीन तों पावेतों खोळंबा, यास्तव उत्तर सत्वर यावें म्हणोन लि’ त्यास निश्या घेतली परंतु त्यांत थोडासी आटक आहे. सयद तुम्हांकडून कार्य करून त्याजपासी गेला म्हणजे त्यांनीं चिठी येथें सावकारास पाठवावी; म्हणजे ऐवज हातास येईल ऐसें आहे.
त्यास दस्तक हुजरे तयार करून सयद याजबरोबर पाठवावे. ऐवजाची चिठी त्याची घेऊन पाठवितील. नंतर दस्तक व हुजरे त्यांस रुजु करून द्यावे. याप्रमाणें सैदास सांगून करावें; अथवा सैदास म्हणावें कीं, चिठी ऐवजाची घेऊन या; मग दस्तक हुजरे देईन.'' याजकरितां येमाची व सैदाची अगोधर जलद रवानगी तिकडे करून चिठी आणवावी. तुमचे विच्यारें कसें करावें ? खातरजमा ऐवजाची कसी ? हें सैदास पुसून करावें. आतां आम्हापासीं सावकाराची चिठी आहे. परंतु त्यांत करार कीं, “दुसरें पत्र परवानगीचे आणून दिल्हे म्हणजे तेवेळेस पत्र पावतांच रु। देईन." याजकरितां सैदास सांगून चिठी आणवावी आणि कार्य करावें. सैदाचे रवानगीस आळस करूं नये. मावळ अथवा गुजराथ श्रीमंतांचे व त्यांचे युक्तीस येईल तसें करावें. सैदास पाठवून मावळांतील खांचराचा प्रकार कळवावा; आणि चिठी ऐवजाची आणवावी. मग दस्तक हुजरे द्यावें, हें बरें ! याजवर सैदाचे तुमचे युक्तीस येईल तसें करावें. ऐवजाविसी कसें बोलण्यांत आलें ? आम्ही लि त्याप्रमाणें किंवा कसें ? हें सयेदासही कळवावें. रा छ।। २४ जिल्काद हे विनंति. लि त्यांत उणें बोलण्यांत आलें असल्यास सयेदांस कळवूं नये. अधिक बोलण्यांत आलें असल्यास सांगावें. हे विनंति.