Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.
विनंति उपरि.
१ हुंडी केंलियास बट्यामुळें तोटा पडतो याचा तपसील लि।। तो कळला कलम.
१ नांवनिसीवार पत्रकाची नकल पाठविली ती पावली कलम----
१ राजश्री नानाकडील जाब सरासरि पाठविला तो पावला कलम –
१ राजश्री रामचंद्र दादो यांचें पत्र त्यांचे चिरंजीस होते तें पावतें केलें. कलम------
जनार्दनपंत चेनापटणकर यांचे पत्र पावलें, नागपुरास जवाहीर आलें। म्हणोन लि।। व त्याचे बंधूचें पत्र त्यांचे नांवाचे पाठविलें तेंहि पावले. त्यास मध्यस्ताचे कानावर घालून ते सांगतील त्याप्रमाणे जनार्दनपंत यांस लिहिण्यांत येईलं. कलम----
१ “ सिद्दी इमामखान याची मोतीं आलीं. बाळाजी व्यंकटेश यांजबरोबर पाठवितों “ ह्मणोन लि. त्यास सिद्दी इमाम यास कळविलें. कलम-----
१ “भारामल व भावसिंग याची मोतीं आणिलीं " ह्मणोन लि; तें कळले. कलम-----
१ “ पांडोबा बारामतीस गेला. चिरं सौ।। दुर्गाबाई पावली” ह्मणोन लि तें कळलें. कलम-----
१ “घासीमीया याजकडील ऐवजांत माझा ऐवज येणें त्याची नांवनिसीवार याद पाठविली. त्यास दोन हप्त्यांचा ऐवज येईल. त्यांत माझेकडील ऐवज जमा करावा. घासीमीयाकडील दोन हफ्ते उगवले असे मामलेदार यांचे सांगण्यांत." म्हणोन लि. त्यास तुम्हीं यास पाठविली त्याप्रमाणें घांसीमीया यांजकडील हप्त्याचा ऐवज आला म्हणजे तुमचा ऐवज जमा करून लिहून पाठवूं. दोन हफ्ते उगवले किंवा नाहींत याचा तपसील काल तुम्हांकडे याद पाठविली त्याजवरून कळेल. कलम----
१" षमषुल उमरावांचे षादीबद्दल जिनस मंबईहून खरेदी होऊन आला; लवकर एकदोन दिवसांत येथून रवाना होईल. " ह्मणोन लिहिलें ते कळलें. अजमसाहेब यास तुमचे लिहिल्याप्रमाणें कळविलें. कलम----
“पालखीचे सरंजाम फार चांगले आहेत. सरकारांत दाखऊन ठरेल तसें लिहीन ह्मणोन लि. तें कळलें. कलम ----
१ बाळाजी रघुनाथ यांस पाठविण्याविसीं आज्ञा त्यास श्रीमंतास विच्यारता “ थांब” ह्मणतात; तेव्हां लाच्यार त्यास आणीक एक महिना लागेल. लाच्यार पाटील कुळकर्णी याविसी मनसबा आहे. इकडील ठीक न पडल्यास पाटलाचें करावें; याचा ताला माला पाहणें. याजकरितां दिरंग, " ह्मणोन लि. त्यास ठीक पडो, अथवा न पडो ! पाटलाचे करावयाचेंच, तिकडील ठीक जाल्यास पर्याय पाटलासी करणें तो निराळा; तेथील ठीक न जाल्यास पर्याय वेगळा. दोन प्रकार करण्याचे आहेत; त्यांतून एक प्रकार प्रसंगानुसार करावा. तिकडील ठीक न जालें तर करावयाचें. नाहीं तर न करावें असें होऊं नये. जसें तेथील ठरेल त्या धोरणासारखें इकडील करावयाचें; परंतु करावयाचें खरें ! या कामास बाळाजीपंत याचे रहाण्याचा उपयोग कांहींच नाहीं. बाळाजीपंत असला तरी तुम्हीं पत्रांत म॥र लिहिल्यावरच कळेल. बाळाजीपंत आपले बरोबर पत्र मात्र घेऊन येईल; इतकेंच ! विशेष काम नाहीं. येथें बाळाजीपंत यावेगळ फार खोळंबा हें तुमचे ध्यानांतच आहे. लिहावेंसें नाहीं. याजरितां इतकें लि. बाळाजीपंत यांस इकडे पाठविणें त्यांतल्या कामाची खराबी नाहीं; असें आह्मांस वाटतें. तुमचें मनांत काय असेल तें असो !
रवाना छ. २४ जिल्काद हे विनंति.