Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.
विनंति उपरी. राजश्री जीवनराव पांढरे यांजविषंईचा मजकूर पेशजी तपसिलें तुम्हास लिहिला आहे; त्यावरून कळलें असेल, पत्राची उत्तरें लवकर रवाना करावीं; व हिसेबाच्या यादीच्या नकलाहि पाटवाव्या. ह्मणजे आपले ऐवजाची तोडजोड यांजपासून ठराउन घेउन पुढील क्रम यथास्थित चालेल. उतरें लिहिल्या मजकुराची सविस्तर खोलून पाठवावीं. र॥ छ, २४ जिल्काद हे विनंति.
छ. २४ रोज पत्र आनंदराव नरसिव्ह याजवळ दिल्हे तें, राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
पो गोविंदराव कृष्ण सांत नमस्कार विनंति उपरि. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष आबदुल गनीखां हाकीमजी पुण्यांत आहेत त्यांचा तुमचा सहवासही विशेष ह्मणोन राजश्री आनंदराव नरसिंव्ह यांचे सांगण्यांत. त्यास हाकीमजी स्नेहास योग्य मनुष्य याजकरितां त्यांचा अगत्य वाद धरून हरयेकविषई साहित्य करीत जावें. र॥ छ. २४ जिल्काद बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हें विनंति. माहे जिल्हेज उर्फ आषाढ मास.
छ. रोज पत्र पंचभाई यांनीं मागिततल्यावरून दिल्हे.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
पो गोविंदराव कृष्ण स॥ नमस्कार विनंति उपरी, येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें. विशेष मौजे भोंडणी उर्फ मामुराबाद रसुलपुरा पा। रावेर हा गांव हालीं सरकारांतून मीर मुराद आलीखान बहादूर पंचभई यांस इनाम आहे. त्याचे बंदोबस्ताविसीं पेशजी मिरफेंत अलीखान बहादुर पुण्यास आले. राजश्री नानांची भेट घेतली. बंदोबस्ताविसीं हुजुरे पत्रें करून दिल्हीं आणि मौजे मारी जागिरीचे अमलाचा दखल करून दिल्हा. त्याप्रमाणें चालत आहे. परंतु स्वराज्याचे, अमलाचा बंदोबस्त होत नाहीं. चोपडेकर कमाविसदार याजकडून मौजे मारीं आनंदराव नामें कारकून आहे. ते यांस नाना प्रकारें दिमती घेऊन उपद्रव करितात. याजमुळें हे हैराण होऊन बोभाट सांगतात. पेशजी यांचे बंदोबस्ताविसीं तुम्हांस जाते समई नबाबानीं व मध्यस्तानीं मा।र सांगीतला; व वाटणी वगैरेच्या यादी तुम्हांपाशीं दिल्ह्या आहेत. तुम्हीं सरकारांत बोलून बंदोबस्त करून दिल्हा नाहीं ह्मणोन हालीं खान मा।र यांनीं नबाब बंदगान आलि यास अर्ज केला. त्याजवरून आह्मांस ईर्षाद केला कीं तुह्मीं मदारुल महाम यांस पत्र लिहून बंदोबस्त करून देवावा. स्वराज्याचे अमलाच्या याणीं दोन शकला सांगितल्या आहेत. एक तो वाटणी करून घ्यावी त्याप्रमाणें कमाविसदार घेत जातील; अथवा स्वराज्याचे अमलाचा मख्ता ठरावून घ्यावा त्याप्रमाणें हे सालाबाद ऐवज दाखल करीत जातील, फरफरमास व सोयरे वगैरे यांस हिसा नाहीं. ते यांचे वहेवटीत राहील. ह्या दोन शकलांतून. एक शकल ठराउन दिल्ह्यास गांव यांजकडे निर्बध चालेल. ह्मणोन इर्षाद केल्यावरून आह्मी राजश्री नानांस आपले हातें पत्र लेहून खुलें तुमचे पत्रांत घातलें आहे. हें तुह्मी वाचून पाहून, गोंद लावून, पावते करून, पेशजीच्या यादी तपसीलवार तुम्हापासी आहेत त्या दाखऊन, याचा बंदोबस्त करून देवावा. येविसीची येथें किती किरकिर आहे हे सर्व तुमचे समजण्यांत आहे. याजकरितां उत्तम रीतीनें नानांस विनंति करून बंदोबस्त करून देवावा व खान मा।र यांचे सांगण्यांत कीं गोविंदपंत नाना कोण्ही कारकून तेथें आमचा वकील ह्मणून आला आहे तो आमचेच पैषुन्यच्या गोष्टी सांगतो. त्यास त्याचे बोलणें मंजूर नसावें, याजकरितां तुह्मास लिहिलें आहे कीं गोंविंदपंत यांचें नाहींत; आणि त्यांचे सांगणें सरकारांतही मंजूर न व्हावें, रा। छ. १ जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ किजे. हे विनंति.
मध्यस्थ व राजे रायेरामा यांचे मागितल्या वरून पत्र लिहिलें असे.