Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.
विनंति. उपरि रावरंभा यास माहे रावल कार्तिक मासापासोन माहवारी वगैरे ऐवजाचा भरणा ता। जिल्हेज आषाढ मासपर्यंत जाला. त्याचा तपशील मारनिलेपासोन रोखे घेतले ते जमा धरून आलाहिदा याद पाठविली आहे त्यावरून कळेल. सदरहुप्रा जमाखर्च तुह्मीं केला असल्यास उत्तंम. नसल्यास याप्रा करावा. ऐन वसूल नगदी सत्याहतर हजार रु पावले. यापैकीं तुह्माकडील वसूल वजा होऊन आठावीस हजार बाकी येथें मुबादला दिल्हा. हा ऐवज तिमाराम हरि यांचे ऐवजीं अथवा हरयेक येथें फडच्या करून लिहिण्यांत येईल त्याप्रा करावें. रदकर्जाऐवजीं पंचवीस हजार रुपये आजपर्यंत वजा करून घेतले.त्यास मानिलेकडे कर्जाबाबत ऐवज पटणचे स्वारीचा व मोहरमाबाबत किती आहे ? त्यांत पंचवीस वजा जातां बाकी येणें किती राहिलें? तें दरमाहा श्रावण मासापासोन वजा कसें करावें ? याचा तपशील खोलून लेहून पाठवावा. त्याप्रा। कारतां येईल. त्याची समजूत पडे असी प्रांजल समजोन याद पाठऊन द्यावी. हलीं मोहरमाबाबत सालमारचे पांच हजार यांस मध्यस्तांनीं सांगितल्याप्रा। दिल्हे. याची व्यवस्था कसी ? माहवारींत वजा करून घेण्याचे किंवा माहवारीसीवाये हें ल्याहावें.करमाळ्यांत खर्च-हाती,घोडीं वगैरेस आजपर्यंत काय पडला हें हरिपंत यांचे माहितगारीनें समजोन ल्याहावें. त्याप्रा। माहवारीचे ऐवजीं रोख्यांत चौदा हजार रुपये जिल्हेज पर्यंत वजा आले आहेत. बाकी येणें किती तें लिहावें. त्याप्रा यांसी बोलतां येईल. र॥ छ, ७ जिल्हेज. हे विनंति.