मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.

विनंति उपरि. राजश्री अंताजी निराजी यांनीं मारडीहून ऐवजांच्या हुंडया पुण्यास पाठविल्या. काहीं हुंड्या सोलापुरीहून बापु सिवदत याचे दुकानींहून केल्या. कांहीं तुळजापुरीहून लिंगापा नाइक यांचे दुकानच्या. हा कारभार बापुदेव सोलापूरकर यांचे मार्फतिनें केला. दोन हजार रु।। हुंडयासिवाय व्याजती अंताजीपंत यांनीं भरणा केला तो ऐवज बापुदेव यांस अंताजीपंतांनीं निकड करून मागितला. सबब बापुदेव सोलापुरास जाऊन त्यानें आपले पत्तीनें चौघा सराफासीं ऐवज घेऊन सोळाशें रु।। अंताजीपंत यांचे यांस दिले, ऐसें असतां राजश्री रामचंद्रपंत सुभेदार व रामचंद्र तिमाजी यांनीं अंताजीपंतास पत्रें पाठविली कीं, आमचा माल सराफापासून तुम्हीं नेला, तो देणें. त्यास हा कारभार परभारा बापुदेव यांचे विद्यमानें ऐवज देऊन हुंड्या घेतल्या. इजाफा ऐवज पडला तो बापुदेवापासोन घेतला. ऐसें असोन सोलापूरकर अंताजीपंत यांचे आंगीं लाऊन लिहितात; व बखेडा करणार यास्तव तेथें तुह्मीं या गोष्टीचा बंदोबस्त करून ल्याहावें. कितेक सोलापुराकडील बोभाट ! याजकरितां अंताजी निराजी यांनीं तुम्हांकडे कारकून पत्र देऊन पुण्यास पाठविला आहे. वरचेवर मारडीकडील कामाचा बंदोबस्त करीत जावा. रवाना छ. २४ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries