Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ शुद्ध ८ मंगळवार शके १७१५.

विनंति. उपरि रावरंभा प्रकर्णी मार. मौजे जवळे हा गांव बांदलाकडे होता तो तुह्मी त्यास कर्ज देऊन आपल्याकडे करून घेतला. बांदल वारला, सबब बाजीनीं त्या गांवची जफ्ती हलीं करविली ऐसें ऐकलें, त्यास आपला ऐवज बांदलाकडून किती येणें हे ता वार ल्याहावें ह्मणजे यासी बोलून ऐवजाचा फडच्या होईल तेव्हां गांव स्वाधीन करावयाचा. उत्तर लौकर यावें. रंभाजी याजकडील जफ्ती बसून द्यावी. कलम----१

तगई प्रकर्णी व वाबले समंधीं उत्तरें पेशजी पत्राचीं आद्याप आलीं नाहींत, पाठवावीं. कलम---१

बजाजी पंत दफ्तराचे पेंचांतुन मोकळे जाले. मध्यस्तापर्यंत पंचाइत जाली. यामुळें बाजीची मर्जी यांजवर कांहीं उदासीन आहे. एक वेळ मध्यस्तासी व बाजीसी बजाजीपंताविषीं बोलून बंदोबस्त होईल तो मागाहून लिहूं. कलम-१

उंदरतप्याचा पाटिल येथें आला आहे. त्याचे भावाबंदाकडे येक हजार रुपये बाजीचें येणें. सबब यानीं चिठी केली. याचा मार वास्तविक कसा तो ल्याहावा. त्याप्रा बोलून बंदोस्त करतां येईल. कलम----१

वराता बाजीनीं पेशजी साडे सोळा हजाराच्या केल्या, त्या फिरल्या.ऐवज पावला नाहीं येविषीं मध्यस्तांनीं सांगितल्या प्रो पेशजी लिहिलें, त्याचें उत्तर यावें. कलम----१

बाजीनीं गोपाळराव बक्षीस पुण्याकडे रवाना केलें. सिंरसाबचे जाबसाल करितां.ह्मणोन बोलतात; परंतु आंतून बाबाराव यांचे विद्यमानें पाटील बावा कल्याणराव यांजकड़े गेले ऐसेही ऐकण्यांत. त्यास तेथे याचा शोध करून काय डौलावर आले हें सावधगिरीनें बातमी ठेऊन ल्याहावें. येथील बंदोबस्त करणें तो करितां येईल. कलम---१
--------

कलमें सुमार साह र। छ, ७ जिल्हेज हे विनंति.