Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.
विनंति उपरी. कल्याणराव प्रकर्ण.-------
१ "कल्याणराव यांस आणून जलसा करणें हें कश्यावरून तुम्हीं लिहिलें ऐसें राजश्री नानानीं मला पुसिलें. याचें उत्तर मीं केलें कीं, कल्याणराव मजकडे येऊन आपल्यासि असें बोलणें जालें म्हणोन सांगत होते, त्याजवरून लिहिले. तेव्हां बोलिलें कीं, कल्याणराव यांस इतके चिकटून द्यावेयाचे नाहीं, याजकरितां वरचेवर उत्तर सांगितलें. त्याचा ग्रंथ इतका मध्यस्तापरियेंत जाला.” म्हणोन विस्तारें म।।र लिहिला तो कळला त्यास तिसरा गृहस्थ कामांत आला, तेव्हां थोड्या गोष्टीवरून मोठे ग्रंथच होतील; असाच काल आहे. आणि प्रसंगहि सर्व नमुदितच आहेत. याजकरितां बहुत सावधपणें वर्तत जावें. इकडेहि सुचविणें असेल तें सुचवावें. आळस करीत न जावा. कलम १
आदवनी वगैरे कलमें निवडून पाठविणार त्या कलमांची याद पाठविली ती पावली. ठराव करून याद येईल ते वेळेस उलगडून लिहावें. ह्मणजे त्याप्रमाणें मध्यस्तासि बलावयास येईल. कलम ----१
“फर्दा कामाच्या दाखवीत नाहीं असे तो ह्मणतां नये. याजकरितां आदवनी वगैरे औघड कामें आहेत त्याची भवति न भवति करून रघोत्तमराव यांस सांगावें; आपलेकडे लिहून पाठवावें; यांत कल्याणराव यांस बोलावुं नये; आपण बाबाराव यांस घेऊन मध्यस्तासि बोलावें. आह्मी फैसल्ले करून देवितों ऐसें ह्मणतात याचाहि अनुभव याजवरून समजण्यांत येईल.'' ऐसा बेत ठरला ह्मणोन लिहिलें; त्यास यांतील एक गोष्ट असी आहे कीं आतां तोडमोडीचा जाबसाल करूं नये. तोडमोडीचा प्रकार कोठपर्यंत कीं, सोहलतीनें, स्नेहाचे रीतीनें जाबसाल करते तर सर्व होते. तो प्रकार वास्तवीक नाहीं. आमचेच मानेवर बसून आम्हांकडील सरकारचे कामाचा फैसला न करितां वरती आणखी इच्छा ठेवणें अश्या चालीस तोडजोडीचा कारभार कां करावा ? याजकरितां कुलफडश्या वाजवीचे मार्गे करून घ्यावा. तरच कलमाचे फडचे. ऐसें नेटानें, केलियास चांगलें. पोंचट कारभार करणें असल्यास दाब राहील हें समजलेच आहे. दौलतीचे कपाळीं असेल तें खरें ! यास कोणाचा उपाय नाहीं. कलम----
तीन कलमें र॥ छ, २४ जिल्काद हे विनंति.