Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. ११ गुरुवार शके, १७२५.
विनंति उपरी. “आवरंगाबादचे तनरव्यापैकीं आजपावेतों वसूल आला त्याची याद पाठविली त्याजवरून ध्यानांत येईल. मदारुलमाहम रोज कळवितात तेव्हां उगेंच खालें पाहवें. असो ! हाल्लीं वसूल जाऊन बाकी येणें त्याची याद पाठविली. मनन होऊन मध्यस्तांसि बोलोन जगधन सावकार याजवर चिठी द्यावी. अथवा रद कर्जी ऐवज कांहीं देऊन बाकी जगधन यांजवर चिठी द्यावी. सारांश ऐवज याउपरि सत्वर ठिकाणीं लागावा म्हणोन लि. “ त्यास तुमचे लिहिल्याप्रमाणें मध्यस्तासि दोन तीन वेळा बोलणें जालें, तुम्हांकडील वसूल बाकीची याद आली ती बाजिनस यांस दाखविली. त्याजवरून यांचे येथें बाळाजी नायक व आहत गुदौला यांचे मेहरनसी वसुलाची यादी आली आहे. एक लाख येकावन हजार दोनशे रुपये सव्वा तेरा आणे १५१२००।।।-। याच्या रसीदाच्या नकलाहि आल्यात; त्या याणीं दाखविल्या. त्यास तुम्हीं यादी पाठविली त्यास व यांजकडील वसूलाचे यादीसी मुकाबला पडत नाहीं. बाकीचे ऐवजाची चिठी जगधन याचे दुकानीं द्यावी. याजपैकीं कांहीं ऐवज रदकर्जात लाऊन द्यावा, हुंडावणीचा म।।र तुमचे लिहिण्याप्रमाणें दोन रु।। सेंकडा बोलण्यांत सरासरी आला आहे. येविषीं मध्यस्ताचें बोलणें कीं मी याचा म।।र राज्याजीसी बोलतो. ते तुम्हांस सांगतील त्यास पाच सात दिवस राज्याजी आपले लग्नाचे गडबडींत आहेत. मध्यस्ताचें याचे बोलणें जालें नाहीं. याउपरि राज्याजी दरबारास गेल्यानंतर जसें ठरेल तसें व यांजकडील वसुलाची यादी आली आहे त्याच्या व रसीदाच्या नकला वगैरे मागाहून रवाना करण्यांत येतील. सध्यां तुम्हांस कळावयाकरितां म।।र लिहिला आहे. र।। छ. २४ जिल्काद हे विनंति.