Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. १० बुधवार शके १७१५.
विनंति उपरि जगधनाकडे रदकर्जी ऐवज पावला असावा. पहिले हत्याबाबत दीडलक्ष व गदवालकराबाबद साडेबावीस व घटाले साडे सतरा व हुंड्याबाबत तीस व वसमतेपो वीस हजार. या प्रा। दोन लक्ष चाळीस हजार पावले असावें. ऐसें असतां येक लाख बतीस हजार पावले म्हणोन लेख हे काय ? येविषी त।। लिहिलें, त्यास मामलेदारा बाबत ऐवज आजपर्येत आला व गदवालकराकडील हुंड्या बाबत तीस हजार एकंदर जमा धरून याचा झाडा दोन यादी अलाहिदा पाठविल्यावरून घटाल्याकडील पंधरा हजार आले. पो परत वजा पन्नास जातां चौदा हजार नऊशें पंनास रुपये नन्हुमल याचे दुकानीं जमा केले आहेत. वसुमतेपो वीस हजारहि साहुका-यांत आहेत. जगधनाकडे दिल्हे असते परंतु वसमतेचे ऐवजाची परवानगी पाठवितों ऐसें तुंम्हीं लिहिल्यावरून ऐवज साहुका-यांत ठेविला. परवानगी अद्याप आली नाहीं. त्यास घटाल्या बाबत व वसमतेचा ऐवज जगधनाकडे घ्यावा ऐसें लिहिल्यास भरणाकरितां येईल. उत्तर यावें. दुसरे वीस हजार वसमतचे तनख्याबाबत खोलंबून पडले आहेत. याजविषी दोन चार वेळ लिहिले असतां उत्तर नाहीं. यास काय करावें ? येक वेल नानास स्मरणपूर्वक यादींत लिहून पुसावें म्हणजे पहिले वीस हजार घेतले त्या सुद्धा माघारे द्यावें किंवा कसें हें। समजेल. पुढें वीस यावयाचे ते घ्यावे न घ्यावे होंहि समजावें म्हणजे तसें करावयासी येईल. हें काम विशेष अडचणीचें नाहीं. या विषई राजश्री नानाचें पत्र घेऊन पाठवावें. म्हणजे पुढें पाटी चांगलें र॥ छ २३ जिल्काद हे विनंति.