Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
विनंति उपरि.

१ “अजमसाहेब यांसि बोललों ‘सध्या हुंड्या घेऊन पाठवाव्या.'
१५००० ममईचे खरेदीबदल.
३०००० मोहरी खरेदीबदल,
--------------
४५०००

पंचेचाळीस हजाराच्या हुंड्या सत्वर घेऊन पाठवाव्या. दिवसगत लागो नये'' ह्मणोन लि। त्यास, ममईची खरिदी पंधार हजारांची करावयाची नाहीं. पांच सात हजारपर्यंत करणें ऐसें यांचें बोलणें. तेव्हां पांच सात हजार काय देतील तो व मोहराबाबत तीस हजार सदरहूचे हुंडीविषयीं आह्मीं त्यांजकडें सांगून पाठविलें. त्यांस, “प्रस्तुत हुंडी होत नाहीं. पुण्याचे हुंडीचा भाव साहुकारांत सेंकडा साडेचार, पांच, साडेपांच, असा असोन हुंडी होत नाहीं. याजकरितां ऐवज आपल्यापाशीं देतों. याप्रा यांचें ह्मणणें. आमचें बोलणें कीं एथें ऐवज घेऊन खरेदीचे तेथें उपयोगी काय ? अगर हुंडावनसुद्धा ऐवज दिल्ह्यास हुंडी करितां येईल. त्यास हुंडावनसमेत ऐवज दिल्यास तुह्मांस लेहूं. ऐवजाचा भरणा कसा करतात त्याप्रा लेहूं. तोंपावेतों तुम्हीं तेथें खरिदी न करावी, यांजकडून ऐवज येण्यास दिवसगत लागल्यास ताण बसेल यास्तव लेहूं तेव्हां खरेदी करावी.

१ “शमषुल उमरा यांचे षादीकरितां सरंजाम आणावयास श्रीरामास मुंबईस रवाना केलें. मजपासीं तर ऐवज नाहीं. तेव्हां मानुरकर का। दार यांनीं एकोणीस हजार ऐवज भरला. त्यापैकीं बारा हजारांच्या हुंड्या करून श्रीरामासमागमें दिल्या” ह्मणोन तुह्मी लि।। ल्यास बारा हजारांचाहि जिन्नस खरीदी करू नये. पांच निदान साहापावेतों खरीदी करवावी. ह्मणोन आज मखां यांनी सांगोन पाल्यास मुजरद मनुष्याबराबर तुह्मीं श्रीरामास मुंबईस लेहून पाठवावें. १ “सिदी इमामखां यांचीं मोती खरीदी करणें, त्यास पुण्यात माहाग; सबब मुंबईस खरीदी करविली '' ह्मणोन लिहिल्या प्रा सिदी इमाम यांस सांगीतलें, ‘उत्तम' ह्मणाले.
परंतु फार दिवस जाले.
-------

कलमें सुमार तीन रा। छ. २ जिल्काद हे विनंति.