मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ शु. ४ बुधवार शके १७१५

विनंति उपरि. “पुण्यांत दुखण्याचा झपाटा भारी ! सीतज्वरानें बहुत लोकांस हैराण करून पाडलें, कितेक जीवें गेले, कितेक दुखणाईत, कांहीं नव उमेदी, कितेक कुणकुणतात.” त्याचा नांवनिसीवार त। लिहिल्यावरून कळला. मोठा उपद्रव जाला! हल्लीं मृगसीतळाई पडल्यापासोन शम जाले असेल, तुमची प्रकृत आतां कसी आहे ? निस्तोष आरोग्य जाल्याचें ल्याहावें. या दिवसांत प्रकृतीस तुह्मीं फार सावधपणें जपून अवषधपथ्यास आळस न करितां प्रकृत नीट राखावी. चिरंजीव तात्यास मधुरा जाला होता. मोठी चिंता प्राप्त होती. श्रीकृपेनें आराम जाल्यावरून समाधान वाटलें. रा छ २ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries