Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
विनंति उपरि.
येथून छ. २२ रमजानापासोन छ. ८ माहे हावाल पावेतों पत्राच्या रवानग्या सात केल्या. तीं पत्रें पावल्याची ता तारीखवार लि।। तो समजला
कलम---१
पाटील बावा कूच करूनं वानवडीवर आले. नदीकडील जमीन काळवट, दिवस पर्जन्याचे; हें कारण लिहील्यावरून समजलें. कलम---- १
“राजश्री नानास पत्रें अपार्ली येतात; ते जाबाकरितां मजपासीं देतात. मला समाधान नाहीं. सबब जाब तटले, बोभाट लेहूं नये." ह्मणोन लि. त्यास तुमची प्रकृत स्वस्थ जाली असेल. नानाकडील पत्राचे जाब फार येणें ते तयार करून लौकर पाठवावे. वरचेवर जाब येण्यास आळस करूं नये.
कलम--- १
रामचंद्र दादो यांचे दोन लखोटे त्यांचे चिरंजीव माधवराव यांस पावते झाले. कलम-----
“सावकार, सराफ, मातबरांनीं हात आटपले. तमाम लोकांची दिवाळी निघतात.” ह्मणोन लि।।. त्यास पुण्यांत साहुकाराची आसी अवस्था हे गोष्ट कठीण ! येथील ही साहुकारांत हुंडीपांडी करण्याची दिकत फार तूर्त आहे. कलम----१
“बावड्याहून ताईवाईकडून हरिकाळा आला. मिरज प्रांतीं वगैरे पाऊस दोन तीन जाले. पुण्याकडे पर्जन्य नाहीं." ह्मणोन लि।। त्यास मृग नक्षत्राचे पाऊस कांहीं जाले न जाले ? धारण कसी ? हें ल्याहावें. इकडेही पर्जन्य जाले. कलम----१
“गंगाधरराव रास्ते यांस वेड लागलें, रामचंद्रराव वारले; बाळाजीपंत ढेकण्यांचा काळ झाला; लक्षुमणराव व्यथिस्त, उदास, काशिस जाणार, तुळा केली; '' इत्यादिक लि। तें समजलें. ईश्वरी इच्छा ! कलम----१
“दत्तपुत्र केडगांवकराचा घेणार, बापु व बाबा दोन्हीकडील संधान राहून त्रितियपंथ करणार,” हे लिहिल्यावरून कळलें. दत्तकपुत्र कोणता घेतला ? सरकारांतून ठराव कसा जाला ? हें कचें ल्याहावें ‘कलम----- १
“मारडकर घाईस आले; मी व आपाजी बाबाजी कांहीं मदत करून पाहातों" ह्मणोन लि।। त्यास देश, काल, समय येक प्रकारचा, वास्तव मदत करणें तें बहुत समजोन पाहून करावी. पेंच न पडे ऐसें जाल्यास करावें. कलम----१