Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
विनंति उपरि. “सुरापुरकराकडील करार जाल्यांत तथा नाहीं. वागवून घेणें. मंत्रीकडे व्यत्यास पडूं नये. ऐवजही येतो. व्यंकटराव उण्यावर असतील त्यास जपावें. गोपाळ आपा त्यांचे त्यांजकडे पाठवावा.'' इत्यादिक लिहिलें. त्यास सुरापूरकराकडील मजकूर मंत्रीसी बोलण्यांत आला. यांचें बोलणें कीं--“एक महिन्याचा करार असतां, आपण या कामाचे दरमीयान, बदल खातर आपली, ह्मणोन आठ महिने सबुरी केली. शेवटीं पैशास ठिकाण नाहीं. कितीही दिवस वाट पाहिली, तत्रापि शेवटीं हेंच. याजकारितां सुरापुरकरास एक वेळ थोडीशी चमक दाखविल्याशिवाय त्यांचे डोळे उघडत नाहींत. हे पक्कें समजलें. यास्तव हा उद्योग याजवर करणें जरूर. शेवटीं समेट करणें तो आपले विचाराशिवाय होणार नाहीं. परंतु कांहीं त्यांजला समजूं द्यावें " या प्रा बोलले. आह्मीं यांचीं उत्तरें केलीं कीं ‘करार बमोजीब ऐवज सुरापुरकराकडून येईल. परंतु आपण वागवून घेतलें पाहिजे.' मंत्रीचें बोलणें “आणीक किती वागवावें ? येक महिन्याचे आठ महीने झाले. अद्याप प्रथम दिवस. वागविण्याची रीत अशीच असते कीं काय ? हें आपणच सांगावे " याजवर बोलणें फार जालें. गोपाळ आपाचा मा॥र यांसी बोलावा तर यांचे ऐवजास ठिकाण नाहीं यामुळें यांची मर्जी नाईकावर खपा. त्यांत गोपाळ आपाचा म॥र बोलल्यास रुचणार नाहीं हें समजोन तूर्त गोपाळ आपाचा जाबसाल बोलण्यात आला नाहीं. दोन लक्ष रुपये तूर्त पाठविणार. त्यांत लाख पुण्याकडून व लाख परभारा येथें पाठवावे. ऐसा बेत. परंतु तोही ऐवज नाहीं. पुण्याकडून येणें त्याची अवस्था तसी. येथें येणें तो अद्याप पैसा नाहीं. मंत्रीसी भिडेनें सुरापुरकराविषयी किती बोलणे आंगेजीचें होतें ? हें त्याचे गांवीं नाहीं. त्यापक्षीं यांचे येहसान अंगावर घेऊन त्यांजकडून काहींच अमलांत न यावें. याप्र॥ कोठ पावेतों दिवसगत करावी ? हें कांहीं चांगलें नाहीं. यास्तव इकडूनही सुरापुरकरास बहुत कांहीं लिहिण्यांत आलें. तुह्मींही हे सर्व प्रकार लेहून ऐवजाची तोडजोड आठ पंधरा दिवसात होत असल्यास ल्याहावें, तो प्रकार त्यांजकडून घडणें असाध्य. ऐसें असतां मंत्रीसी बोसणें तसें अंग टाकून बोलतां येईल. यांची नजर तूर्त त्यांजवर वांकडे चालीची दिसती. ऐवजाची सरंबराई होऊन आल्यास बोलूनच फेदफे ' करण्याची शकल ठरवितां येईल. नाहीं तर केलें कर्तव्य व्यर्थ होऊन बखेडा पडतो. हें मनन करून त्यांजकडे लिहिणें ते ल्याहावें व इकडे खुलासा उत्तर पाठवावें. त्याप्र।। समजोन बोलतां येईल. सुरापुरफर यांचा प्रतरणेचा कारभार, बोलावें त्याप्र।।, कांहींच अमलांत येत नाहीं. लबाड कारभार त्यांत हर्फ येण्याचा प्रकार. याजकरितां बेजार जालों. कृष्णाजीपंत तुह्मांपासीं बजावून गोष्टी सांगतात, तितकेंच ! परिणाम सुधा नाहीं. पार पडणें ईश्वराधीन आहे ! र॥ छ० २ जिल्काद हे विनंति.