Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ शु. ४ बुधवार शके १७१५.
विनंति उपरि.
१ राजश्री हरिपंत तात्या व आबा चिटणीस तात्याचे बागांत भोजनास गेले. तेथें खिलबत झालें. याचा त। लिहिला व येथून तुह्मांस कुफिया लिहिलें होतें; त्याचीं उत्तरें तुम्हीं लिहिल्यावरून ध्यानांत आलें. त्यास तुमचे लिहिण्यावरून तर खर्चातसें वाटतें. जोंपर्यंत हिंदुस्थानांत गेले नाहींत, तोंपर्यंत आमची खातरजमा होत नाहीं.
१ बेदरच्या गोष्टीविषई संज लि. येथें नाहीं. बलकी मागील फडचे व पुढें स्वच्छता व्हावी ऐसी कल्याणराव यांची आर्जू ह्मणोन लिहिलें. त्यास ईश्वर असेंच करो !
१ साहासें चाळीस मोहरा खरीदी केल्या ह्मणोन लि. त्यास तूर्त इतकेंच । पुरें करावें, याचा ऐवज व आणखी खरीदीचे ऐवजाची तरतूद करूं तेव्हां खरीदी करावी.
-----
३
कलमें सुमार तीन र॥ छ २ जिल्काद हे विनंति.