Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.

विनंति उपरि. राजश्री कल्याणराव कवडे छ, १४ शवालीं राजश्री नानाकडे आले. आपले खासगत कामाची विनंति करून ‘नवाबाकडील कामें उगवावीं, मध्यस्तासी स्वच्छता असावी, हें काम मला सांगून पहावें’ इत्यादिक बोलण्यावर उत्तर जालें-कामें उगवल्यावर काय गुंता ? इतकें जालें आसतां बाहेर लोकापासीं जसा स्वभाव त्याप्रमाणें बोलणें, त्याच अन्वयें इकडे मध्यस्ताकडेंही बजाऊन पत्रें आलीं. हा म।।र मध्यस्तांनीं आह्मांसीं बोलण्यांत आणिला. याचीं उत्तरें प्रत्युत्तरें, प्रथम मध्यस्त आह्मीच, मागाहून बाबाराव यांस बोलाऊन घेऊन, बोलणें जालें याचा कचा त। ‘बाबाराव आह्मांकडे आले' इत्यादिक राजश्री नाना यांचे पत्रीं लिहिल्यावरून कळेल. सारांश ज्याचा जो स्वाभाविक धर्म त्यांनी त्या प्रे॥च करावें हा त्यांचा मार्ग. समजणारास सर्व समजतें. तुम्हांपासीं कल्याणराव येऊन बोलले त्याचाही मार समजला. या प्रकर्णी राजश्री नानास पत्रें लिहिलीं त्याचीं उत्तरें लौकर यावीं. रा। छ० २ जिलकाद हे विनंति.