Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पु॥. राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति उपरि “बजाजीपंत व वक्षी व जामदार यांजला दफ्तराचा
तगादा रावरंभा यांनी केला हें मध्यस्तासी आमचें बोलणें झालें, दर्याफ्त होणार '' इत्यादिक पेशजी लिहीण्यांत आलेंच आहे. छ. २२ सवालीं दोन प्रहरास मध्यस्तांनीं जलसा केला. रावरंभा आले; बाबाराव व हरराव यांजलाही बोलाऊन आणिलें. बजाजीपंत, बक्षी, जामदार आणून दफ्तराविषयींची भवति न भवति जाली. मध्यस्तांनीं आम्हांकडे येण्याविषयीं सांगोन पाठविलें. त्यास, अस्तमानीं सांवतखान यांस घेऊन जाण्याचें, सबब दोनप्रहरीं जावयास अवकाश न जाला. दुसरा चोपदार आला कीं ‘आपल्याकडून कोणास पाठवावें. त्यावरून माधवराव यांस पाठविलें. आडीच प्रहरपर्यंत जलसा जाला. “उदईक याच समयीं निर्णय सांगतों' याप्र।। सांगोन , ते दिवसीं इतकें जालें. अस्तमानी आह्मीं गेलों तेव्हां जाला म।।र मध्यस्तांनीं सांगितला. “उदईक जलसा आणिक होणार ' याप्र।। बोलले. त्यावरून छ, २३ रोजीं मध्यस्तीकडे अगोदर रावरंभा, बजाजीपंत वगैरे गेले. दोन प्रहरा आह्मीही गेलों, बक्षीचे हतची एकंदर याद दफ्तराची पाहावी ह्मणोन मध्यस्तानीं दिल्ही. त्यांत कितेक दफ्तरें सरेबमोहर; व कितेक 'बेमोहरेचीं याप्रा। लिहिलीं,-त्यांतच बीबीकडील दफ्तर लिहिले आहे. बक्षीचें ह्मणणें–“बजाजीपंत दफ्तरें सांगत गेले. मी लिहीत गेलों. जामदारानें उचलोन ठेविलीं. मध्यस्त आह्मांस विचारू लागले–' ह्याचें कसें ?' आह्मीं उत्तर केलें ‘ ज्याचे जिमेस त्यानें द्यावें. रावरंभा यांचें ह्मणणें ‘दफ्तर लाल छींटाचें.' बक्षी, बजाजीपंताचे बोलण्यांत ‘पांढरे रुमालाचें' ; जामदारास फुरसीस केली, त्याचें ह्मणणें ‘वरता सफेत रुमाल आंत छीटाचें लाल.' याजवर मध्यस्तांनीं तर्क केला कीं:--दफतर कोठें गेलें नाही त्यांतच आहे. रावरंभा यांनीं पाहतां ‘लाल.’ छीटाचें नाहीं, वरतें सफेत कपडा आहे, ह्मणोन सांपडलें नाहीं' ऐसें त्यांचें ह्मणणें. यांनीं कांहीं दफ्तर सोडून पाहिलें नाहीं. त्यापक्षीं तेथेंच आहे. मोहराचीं दफ्तरें तितकीं आणावीं म्हणजे तें दफ्तर सांपडतें. याजवर आह्मी बोललों कीं - अगर तें दफ्तर तेथें न सांपडल्यास जिमा कोणाचा ?' मध्यस्त बोलले ‘ यादी बमोजीब एकंदर दफ्तरें जामदाराचे स्वाधीन मोजून केली; यांत उणें आल्यास जामदारानें द्यावें, या प्रा भवति न भवति होऊन ‘ दफ्तराचे शोधाकरितां बक्षी व बजाजीपंत व जमादार यांनीं हैदराबादेस जावें' याप्रा मध्यस्त बोलले. आह्मीं उत्तर केलें “यांनीं जाण्याचें काय कारण ? जामदारांनीं जावें. ' मध्यस्तांनीं सांगितलें “मुजाका नाहीं. नोकर आहेत, त्यापक्षीं जावें व जामदारास दफ्तरें कोणतीं हें समजणार नाहीं यास्तव यांणीं जाऊन सरबमोहर दफ्तरें येथें आणावीं. खोलणें तीं येथें खोलावयास येतील.” याप्रा। ठरलें. बजाजीपंत वगैरै चौघे शहरास जाणार. कचें समजावें सबब लि।। असे. बजाजीपंत वगैरे शहरास दफ्तरे आणावयास गेले. आज उद्यां येतील, रा। छ. २ जिल्काद हे विनंति.