Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

३ नाना पुरंधरे यांचे पुत्र बज्याबा यास पुत्र दत्तक महिपतराव त्रिंबक ऊर्फ नाना पुरंधरे याणीं सरंजामी याचा कारभार करावा ह्मणोन श्रीमंतानें सांगितले. श्रावण मास पागेचें काम निळकंठ महादेव पुरंधेरे यांजकडे सांगितलें, त्याचे तर्फेने सदाशिवपंत फाटक पागेचे काम पहात होते.

४ श्रावण मासचा देकार पांच दरवाजे मिळोन दिला. अडीचे लक्ष रुपये खर्च झाला. बाजीरावसाहेब व आप्पासाहेब व मोरोबा फडणीस देकार म्यावयास होते. दवलतराव शिंदे देकारांत आले होते. प्रदक्षणा सर्वानीं केल्या. समारंभ यथास्थित झाला. ब्राह्मण वाड्यांत व पर्वतीचे मिळोन बेचाळीस हजार झाले.

५ ढंढेरे याजकडे हुजुर पागा होती. त्याजवर नारोबा आठवले याची चौकशी नेमली. श्रावण शुद्ध १३ छ. ११ रबिलावल.

६ मोरो बाबुराव फडणीस यांस तारिख घालावयास विजयादशमीस सांगितलें.

७ नाना फडणीस मृत्यु पावले. बाळोबा वगैरे मारले गेले व पदरचे मंडळींपैकीं बहुतेक कैद केलें. अमृतरावसाहेब निघोन गेले. आतां शिंदे गेले असतां बखेडा होणार नाहीं असें बाजीराव साहेब याणीं मनांत
आणून. कार्तिक श्रु। १२ छ, १० जमादिलाखरी दौलतराव शिंदे यांस निरोप दिला. खंडेराव होळकर त्यांचे हवाली केले. कार्तिक अखेर पावेतो शिंदे वानवडीवर राहून जांबगांवास गेले; तेथून पुढें गेले. सरजेराव कागलास जावयाकरितां राहिले. बराबर गेले नाहींत. गाईकवाड यांजकडून दाहा लक्ष रुपये शिंदे यास सरकारांतून देवविले. जावजी पाटील निसबत गाई कवाड याणी वाघोलीचे मुकामीं शिंदे याचे लष्करांत जाऊन विसा दिवसांत ऐवज बडोद्यांत पाठवून द्यावा याचा करार करून खास हवाला घेतला, नरसिंह खंडेराव विंचुरकर व रंगराव राजे बहादुर व पवार रघुनाथराव बळवंत जायगांवकर यांणीं चार पतकें बराबर घ्यावी व काशीराव होळकर यास बराबर ध्यावें असें निरोपसमयीं ठरलें. येविषयीं शिंदे यांचीं पत्रें कीं गाईकवाड़ याजकडील ऐवज पटला नाहीं. व खंडेराव होळकर व चार पतके यांस आज्ञा होऊन रवानगी सत्वर झाली पाहिजे ह्मणून सरकारांत व बाळोजी कुंजर यांस छ. २१ फजल व १६ फजालचीं पत्रें चाळीसगावचे मुक्कामाची आली ती राबिसनसाहेब याजवळचे कागदांत सांपडली ती त्यावरून—