Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
यशवंतराव होळकर यांचें पत्र छ, १३ जमादिलाखरचे सरकारांत आलें कीं, शिंदे याजकडील बाया याणीं पुण्यापासून येथपर्यंत मुलखाची धूळ करून कोठे ठिकाण राहूं दिला नाहीं. पुढेंही येथूम बहकुम जावयाची चाल पाहून त्याची खातरजमा करून जवळ जावणोन घेतल्या असतां मुलखांत धूम आरंभून उज्जनीचा विध्वंस करावा ही दृष्टि पाहिली. मार्गाची चाल एकही दिसेना. निरोपाय जाणून स्वाधीन करणें प्राप्त होऊन, आसमंतात घेरा घालोन घ्यावा तों ज्वारीचें शेतांतून निघोन उज्जनींत गेल्या. सभोंवति नाकेबंदी ठेविली आहे. कदाचित् निघोन गेल्यास त्यांचे मागें फौजांचीं रवानगी करून ज्यांत बंदोबस्त तेंच घडेल. खर्च घरचे कलहामुळें पराकाष्ठेच्या चाली होऊन कांहीं ठिकाण राहिला नाहीं. याउपरी व इकडील शिंदे यांजकडील बंदोबस्त होऊन ऐक्यता राहून व पूर्वरीतीनें सरकार चाकरी घडे ते केलें पाहिजेल ह्मणोन पत्र छ. २१ जमादिलाखर कार्तिक वा। ८ मीस आले. त्याचें उत्तर सरकारांतून गेलें कीं लक्ष्मीबाई उज्जनींत जातां मेवाडचा रोख धरून निघोन गेल्या ह्मणोन ऐकण्यांत होतें. त्याचे पिछास तुह्मी फौज पाठविली असेल व येविषयीं दौलतराव शिंदे याणींही तिकडील सरदार इंगळे व जनरल याजला लिहून पत्राच्या रवानग्या केल्या आहेत. त्याप्रमाणें तेही पाठलाग करतीलच. परंतु तुह्मीं त्याची वाट ज्या हाता जिकडे गेल्या असतील तिकडे शोध लावून जलदिनें फौजेच्या रवानग्या करून सरकार आज्ञेप्रमाणें ज्यात हास्तगत ते करणें. बंदोबस्त प्रकरणीं लिहिलें त्यांस येविषयीं मल्हार शाबजी यांशीं बोलण्यांत आलें आहे. लिहीतील त्याजवरून कळेल. मशारनिल्हे सरकार आज्ञेप्रमाणें लिहितील तेंच खचीत समजोन इकडील बंदोबस्त विषयीं संशय न धरावा. लिहिल्याअन्वयें करणें ह्मणोन उत्तर पाठविलें. होळकर यांचें पत्र व उत्तराचा मसुदा राबिसनसाहेब यांजवळचे कागदांत सांपडला त्यांजवरून.
१ श्रीमंताची स्वारी मार्गशीर्ष मासीं निघोन सासवडास नाना पुरंधरे यांचे वाड्यांत जाऊन राहिले. तेथून जेजूरी, मोरगांव, भुलेश्वर, वाई, वगैरे गेले. पुरंदर पाहिला नारायण याचें दर्शन घेतलें. पुण्यास माघ शु। ७ मीस दाखल झाले.