Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

२ वसई सरसुभ्याचें काम वामनाजी हरी मराठे यांजकडून दूर करून बाजीराव गोविंद बरवे यांस दिलें. तें काम कांहीं दिवत खंडेराव रास्ते व आन्याबा अभ्यंकर करीत होते. पुढें बाजीराव बर्वे यांजकडून सरसुभा दूर करून खंडेराव रास्ते यांजकडे सांगितला. शिंदे हिंदुस्थानांत गेल्यावर सरजेराव घाडगे कागलास जाऊन माघारे पुण्यास येऊन कुंजर यांचे घरीं खर्चाकरतां धरणें दिलें. तेव्हां श्रीमंतांनीं लोक पाठवून कुंजर यासह सोडून घेऊन सरजेराव यांस पुण्यांतून काढून दिलें. ते दरकूच शिंदे याचे लष्करांत गेले.

३ श्रीमंताकडील बाळोजी कुंजर व शिंदे यांजकडील देशमुख व लिंबाजी भास्कर व बाबाजी पाटणकर एक विचारे कारभार करूं लागले. सदाशिव माणकेश्वर याजविषयीं खातरी श्रीमंताजवळ बाळोजी कुंजर यांनीं करून सरकारांतून जवाहीर अंगावर घालावयास देऊन भागानगरास वकिलीवर पाठविलें. त्यांचे कारभारी कृष्णाजी भवानी श्रीमंताजवळ राहिले.

४ जयवंतराव महार्णवर फत्तेसिंग बहादर यांजकडील सरंजामाची जप्ती सालमजकूरी केली छ. १० मोहरम.

५ कृष्णाजी दाभाडे यांजकडील सरंजामाची जप्ती सालमजकुरी केली छ. २२ मोहरम.

६ शिवाजी महाराज कोल्हापुरकर यांस पुत्र फाल्गुन व॥ ७ रविवारीं थोरले स्त्रीस झाले. त्याचें नांव आबासाहेब ठेविलें.

७ नारोपंत चक्रदेव कारभारांत होते तों पावेंतों तारिख तेच घालीतच होते व मामलती जिल्हेस कोणी पैका देणें व खर्च करणें त्याचे परवानगीनें तारिख होत असे. ते कैद झाल्यावर श्रीमंत तारिख घालों लागले. व चिंतोपंत देशमुख यांस माहीतगारीकरितां कामांत घेऊन मामलती जिल्हेस लावूं लागले. महाली मुलखी काम खुद्द पाहूं लागले. वरकड राजकारणी कामावर बाळोजीं कुंजर वगैरे होते. रसद सरकारी व आपली खाजगी असा ठराव करावयाचा सांप्रदाय नवा श्रीमंतांनीं सुरूं केला.

८ धोडोपंत गोडबोले यांस पलटणें तयार करावयासं सांगितलीं.