Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३

विनंति विज्ञापना. मिस्तर किनवी दिलावरजंग बाहादुर इंग्रजाकडुन नबाबापासीं वकींलीचे कामावर आहेत. त्यासे यांची बदली इंग्रजांनीं करून यांचे कामावर दुसरा वकील पाठविला. तो येणार. सबब येथुन किनवी नबाबाची व दौलाची रुखसत बेऊन जाणार, किनवीनें आपला सरंजाम कुल असबाब येथुन हैदराबादेस रवाना केला. रुखसत होऊन दरमजल जाणार, हा मार मीरआलम यांस विच्यारला. त्याचे सांगण्यांत कीं दिलावरजंग यांची तंगीरी१ होऊन जातात पैसे नाहीं. पलटणचे स्वारीहून आल्यापासोन दिलावरजंग यांची तबियत दुरुस्त नाहीं. येथील आवहवाही माफिकत नाही. सबब लाड बहादुर व नवे जनरालास यांनी सांगितले कीं मी विलायेतीस जातो. तर प्रकृत हुषार होईल. त्यावरून दिलावरजंगास हुकुमही आला कीं तुह्मीं विलायेतीस तबियत आराम होण्याकरितां यावें, त्यावरून जातात. यैसे यांचे बोलण्यांत. सारांश किनवी येथुन रवाना होत आहे. मागाहुन विनंती लिहिण्यांत येईल. किनवी येथुन जाणार, येथील कामावर मिस्तर इष्टवट यास ठेविलें. दुसरा किनवीचे मुबादला येणार तोंपर्यंत काम इष्ठवटानें चालवावें यैसें ठरलें आहे. र॥ छ २४ जावल हे विज्ञापना.