Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. तिमाराव देशपांडे वसमतकर परागंदा जाला. त्याजला धरावयाकरितां सैद मुनवरखान व बाजीराव अमीन याणीं उद्योग बहुत केला. परंतु हस्तगत जाला नाहीं. सांप्रत तिमाराव याचे राहण्याचा गांव मौजे लोक पा। वसमत येंयें सैद मुनवरखान व बाजीराव हजारपांचसें लोकांनिसी जाऊन गांवास महासरा केला. आंतुन गोळी चालती. तिमाराव याचा पुतण्या व चीज वस्त वगैरे तेथें आहे. लोक येथील गढही मजबुत आहे. गढी घेऊन तिमाराव याचीं मुलें मनुष्यें चीजवस्त जे तेथें असेल ते हस्तगत करावी. याप्रों सैद मुनवरखान व बाजीराव यांस ताकीद व उभयतांची कुमक करण्याविसीं भारामल यांसही याची आज्ञा आहे. मकान अद्याप यांचे हातीं आलें नाहीं. होईल त्याप्रों विनंती लिहिण्यांत येईल. तिमाराव यास विठ्ठलपंत सुभेदाराकडील आश्रा ऐसेंही यांचेथें वर्तमान आहे. रा छ. २४ जमादिलावल हे विज्ञापना