मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना, कृष्णमा करोडा वारल्यानंतर करोडगिरीचें काम त्याचे पुत्राकडे दौलांनीं ठेऊन कृष्णमाचा भाऊ पापमा याचे हातें कारभार घेतला. यैवज सरकारचा कृष्णमाचे बेरजे अन्वयें बहुत येणें. त्याचा निर्वाह होईना. सबब पापमा दुखणें आलें ह्मणोन निरोप घेऊन गेला. त्यानंतर रामया ह्मणोन दुसरा भाई कारभारावर होता, त्यास यैवजाची सख्ती लागली, तेव्हां त्यानें हैदराबादेस जाऊन पांच लक्षांची तोड पाडितो ह्मणोन रुखसत घेऊन हैदराबादेस गेला. यैवजास ठिकाण नाहीं, कृष्णमा याचे हाताखाले हासन अली खान ह्मणोन होता. त्यानें तीन लाखाची सरबराई केली. सबब त्याजला करोडगिरीचे नयाबत मीरआलम यांचे विद्यमानें सांगोन काम चालविलें. परंतु यैवज बहुत येणें. त्याचा तगादा खान मार यास सख्त आहे. व कृष्णमाची अमानत साहुकार वगैरे जेथें जेथें जसी, त्याचाही शोध करून तगादा होत आहे. कादरखान पहिला करोडा व नुरमहंमदखान सिदी इमामखानाकडील यांजकडेही करोडगिरीचें संधान आहेच. पुढें काय ठरतें त्याप्रों लिहिण्यांत येईल. र।। छ. २४ जावल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries