Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
मार्गशीर्ष व. ३ शुक्रवार शके १७१५ ता. २० दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. दौला छ ६ जावल मंगळवारी शिकारीहुन आल्यापासोन त्यांची तबियत बेआराम. पाठींत वायुचा दर्द; आर्मी ज्वर, याचे उपशमनार्थ महमदमाखां हाकिम यांची दवा मीरअलमजवळ बसोन दोन तीन दिवस हेंच जालें. दरबारची मनाई होती. छ, १० रोज शनवारी दौलांस कांहिंसें स्वस्थ वाटुन मर्दाना केला. रावरंभा व राज्याजी व नवबाचे मुनशी व अर्जबेगी यांस बोलाऊन घेतले. आह्मी कोल्हेरपंत यास पाठविलें. तेही जाऊन वसले. दौलांनी आपले प्रकृतीचें वर्तमान सांगितलें. "शरीर भोग आहे, दोनच्यार दिवसांत स्वस्थ होईल " याप्रा बोलले. येक घटका पर्यंत सदरहु मंडळी होती. त्यानंतर लोक आपलाले जागीं आले. दुसरे दिवसीं दौलाचा परामर्श करून यावें यास्तव प्रातःकाली आह्मी गेलों. बाहेरील कचेरींत मरिअलम व हाकीम व नबाबांचे जावई वगैरे लोक होते. रावरंभादि आले. तेथेंच सर्व बसोन दौलाकडे आंत खबर पोंचविली. त्यास शनवारचे रात्री पासोन दौलाची प्रकृत फिरोन बिघडली. प्रातःकालीं बहुत विकल; शरीरी ग्लानता बेहोष, नबाबांनी सांगीन पाठविलें कीं, कचेरी व लोक मेळऊन बसों नये, येहतीयात असावी. मीरअलम महंमदमाखां यां उभयतांस मात्र जाण्याची परवानगी. वरकड सर्वत्रांस मनाई. याप्रा बंदोबस्त जाल. मीरअलम व हाकीम दोघे दौलापासीं क्षणभर जाऊन हाकिमानें तबियत पाहुने अवषध दिल्हें, आणि उभयतांही बाहेर आले. दौला कांहीं शुद्धीवर नव्हते अशी अवस्था मीर अलम व हाकिमांनी तबियतीचा अहवाल सांगितला.इतकें तेथे होऊन तेदिवशी दौलाची गांठ न पडतां सर्वत्र आपलाले स्थळास आले, तो दिवस रात्र दौलाची प्रकृत अस्वस्थ. कोणाची वारयाबी नाही. दुसरे दिवशी दोन प्रहर पावेतों तोच प्रकार. मीर अलम व हाकिम दवा देऊन आले. अस्तमानीं कांहीं स्वस्थ होऊन राज्याजी, समशेरवंत व रोशनराव यांस अर्ध घटका बोलाऊन घेऊन भारामलाकडील पत्राचे जाब लिहिण्यास सांगितलें. छ १३ रोजी नबाबांनी शिकारीस जाण्याची सिद्धता केली. बराबद जाले. दौला जनान्या चे वाटेनें म्यान्यांत बसोन नवाबांपासीं गेले. डे-यांत दौलांस नबाबांनी त्यांचे तबियतीचें वर्तमान विच्यारिलें. यांनी अर्ज केला, नजर गुजराणिली. मीरअलम व हाकिम व राज्याजी व आह्मांकडून कोल्हेरपंत हे तेथें ते समईं होते. येक घटिकेंत याप्रा होऊन दौलांस निरोप दिल्हा. आपले मकानीं आले. नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. दौलाची मिजाज छ मारीं स्वस्थ कांहींशी जाली. छ १४ रोजी दोनप्रहरपर्यंत बरेच होते. मागती प्रकृत बे आराम या प्रा यांचे भिजाजीचा अहवाल दिवसांत फेर दुसराहोतो असें आहे. याजवर प्रकृत फिरोन जशी डौलास येईल त्याप्रा विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा। छ १६ माहे जावल हे विज्ञापना.