Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

आहों, नवाबाची दौलत बहुत जलिल झालियास आणखी जल देणें अथवा रोनक आणणें हा यखतियार तुह्मांकडे आहे, कारण तुह्मीं नवाबाचे घरचे खानाजाद नौकर एकसू आहां, एकसूपणाचा धर्म हाच कीं खावंदाचे दौलतीची बेहबूद असेल तें समजावावें, तमाषबिनी करणार बहुत आहेत, परिणामावर दृष्टि देऊन जें नेक तें करावें. ऐशीं मनुष्यें कम आहेत. त्यांनीं ह्या गोष्टी ऐकून घेऊन बोलिले जें, तुह्मीं बोलतां हें खरें आहे, सारांश, प्रस्तुत जो हंगामा बरपा झाला याचे बंदोबस्ताची षकल कशी श्रीमंत करितात ती बोलावी. ऐसें ह्मणों लागले. हजरत आणि श्रीमंत एकदिल होऊन तजवीज केलियास काय चीज आहे, पाहिजे तसा बंदोबस्त होईल, तुह्मीं आपले करारमदारावर मजबूत असावें, दिवसेंदिवस श्रीमंतांचे दोस्तीमुळें स्वस्थ असून आपले दौलतीस रानक हजरतीनीं आणावी, दोस्ती मजबूत आणि वृद्धि व्हावी, याविषयीं आह्मांस आज्ञा होत असावा, आह्मांकडून दोहीं दौलतीची सेवा करून घ्यावी, अशा कार्यावर मुतवजेह व्हावें, आणि काय होतें तें पहावें, याप्रमाणें रियासतीच्या चाली असाव्या, तें सर्व एकाकडे राहून संशय उकरून काढावे यांत मजा नाहीं, जे नौकर हजरतीचे अंहित, त्यांनीं दौलतीचे बेहबुदीवर नजर ठेवावी, आपले जातीचे पेष आमदेवर दृष्ट दिलियास खावंदाचे दौलतीस धक्का बसेल, दौलत पेंचांत आलियावर तुह्मीं कोणीकडे रहाल ? काल तुमचेसमक्ष हजरतीजवळ आह्मीं बोलिलों जें यासमयीं बोलण्यांत नाहींत, ते आमचे वाईट मानून लटक्या कवाहती उठवितील, हजरतीस समजावितील, तें मजूर असूं नये, तेंच नमुदास आलें, सरकारचा जाबसाल कसा तरी होईल, राहत नाहीं, तुह्मीं दरबारचे मुत्सद्दी, आज तुमचे विद्यमानें बोलावें तें दुस-यानें वाईट मानावें, खावंदानीं भलत्याची गोष्ट ऐकून मनांत विचार न केलियास तोहमत आह्मांवर यावी, आह्मांस दगा करावा ऐसें कित्येकांचे मनांत ह्मणोन बहुत ऐकितों, त्यास मला तुमचा कोणाचाही विश्वास नाहीं, श्रीमंतांची जात आहे, ते तर लांब राहिले, त्यास जे श्रीमंत तेच हजरत, हजरतीने जातीचा मात्र विश्वास इतकें खरें, आज दोन दिवस आपले घरांत निद्रा करीत नाहीं, ढाल तलवार घेऊन आपले लोक आहेत त्यासुद्धां हुशार, दोन वेळ मशाल पाठवून रात्रीं वाड्याचा सेवा करवीत असतों, कारण आपला परकी कोणी वाड्यांत आहे नाही हें. समजावें, लोक बहुत येणार जाणार, कोणाचें मन कसें आहे हें समजत नाहीं, त्यास तुह्मीं हजरतीशीं दौलतखाहीचे मार्गे सर्व बोलून. मला सांगून पाठवावें, हजरतीनीं आपले दौलतीस रोनक आणावयाचें काम आह्मांपासून घ्यावें, आह्मीं सिद्ध आहों. याप्रमाणें बोलणें समाधानीचें होऊन, उभयतां गेले. रात्रीं नवाबाशीं बोलणें होऊन प्रातःकाळीं सांगून पाठवूं याप्रमाणें बोलिले. नंतरचें वर्तमान अलाहिदा लिहिलें असे. त्याजवरून ध्यानांत येईल. र।। छ ६ मोहरम हे विज्ञापना.