Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[७५]                                                                              श्री.                                                                          २३ जुलै १७९५.

विज्ञापना ऐशीजे. अजमखान व सरबुलंदजंग व मुनशी त्रिवर्ग असतां नवाबाशीं बोलणें झालें. निरोप घेऊन आलों. तों मीर अलम बहाद्दूर खालीं बसले होते. त्यास नवाबांनीं बोलाविलें नाहीं, ह्मणून खप्पा होते. माझी भेट उभाउभी झाली. जवाब सवाल बोलण्यांत आला ह्मणून त्यानीं पुशिलें. उत्तर दिलें कीं, उदईक सांगून पाठवीन. घरास आलों. दुसरें दिवशीं वर्तमान ऐकिलें कीं, नवाबाचे मनांत कोणी संदेह घातला आहे. तुह्मांस दगा दो चहूं दिवसांत होणार असें दोघां चौघांनीं बातनी सांगितली. त्याजवरून बहुत विचारांत पडलों. अविचार प्रकार जेथें झाला तेथें संदेहास कारण. शिद्दी इमामखान याजकडे कांहीं दोष लागून होता. अदावतीमुळें त्याजवर पेंच आला. तसाच अविवेक झालियास काय करावें ह्मणून बहुत फिकिरींत होतों. तों सायंकाळीं मीर हैदर मुनशी याजकडून रुका आला त्यांत लिहिलें होतें कीं, सदाशिव रड्डी याजकडे तुह्मीं एक दोन साहुकार पाठविले आहेत, कारकूनही तुह्माकडील गेला, खर्चाची सरबराई तुह्माकडून त्यास होत आहे, ऐसें ऐकिण्यांत आलें, त्यास काल नवाबाजवळ खातरजमेचें बोलणें दौलतखाहीचें झालें तें काय ? आणि हें वर्तमान ऐकतों हें कसें ? याचा जवाब पाठवावा. हा रुका पाहिल्यावर मनांत आलें जे, अशा तुफानाच्या गोष्टी अदावतीनें कोणीं सांगितल्या ? त्याजवर अविवेक ज्ञालियास कसें करावें ? ह्मणोन बहुत चिंतेंत पडलों, शेवटीं मनाचा निश्चय केला , जे श्रीमंतांचे आणि नवाबाचे दोहीं दौलतीची दौलतखाहीची चाल आपली हें वास्तविक आहे, मग याची चिंता कशास करावी, ईश्वर तर सर्व पाहत आहे, मुनषीजीचे रुक्याचा जवाब पाठविला कीं तुह्मीं आमचे येथें यावें, ह्मणजे समक्ष या रुक्याचा जबाब बासवाब देण्यांत येईल, मुनषीनीं तो जवाब घेऊन दरबारास गेले. नवाबास सांगितलें. नवाबानीं त्यास आज्ञा केली कीं, उदईक तुह्मीं त्याजकडे जाऊन पुसावें. त्यावरून दुसरे दिवशीं मुनषीनीं सांगून पाठविलें जे, दरबारास जाऊन सरबुलंदजंग यास घेऊन येतों. दोनप्रहरचे वेळेस उभयतां आले. सहा घटिका त्यांशीं बोलणें झालें. बोलण्यांतील विस्तार बहुत, परंतु थोडासा लिहितों. त्या बोलिलों जे, तुह्मीं रुका हुजूरचे हुकमावरूनच पाठविला असें वाटतें, त्यास याचा जवाब हाच आहे कीं अशा अफवाई खबरेनें मनांत संदेह येऊंच नये, कारण श्रीमंतांस अशी गोष्ट मंजूर असती तर खरड्यावर जें च्याहते तें करते. तो वक्त हातचा कां जाऊं देते, नवाबाची दौलत बुडवावयाची नाहीं हेंच कायम ह्मणोन सवालजवाब सुलटचा ठरला, यासि आणिं तुह्मीं संशय घेऊन पुसतां यास काय, संबंध ? एवढ्या मातबर दौलतींत असे संशय घेणें चांगलें नाहीं, हीच गोष्ट तहकीक करावी असें मानस असल्यास उत्तम, आह्मी सिद्ध आहों, दस्तऐवज अथवा पैका याचा मुद्दा साबीत तुह्मीं करावा, अथवा आह्मी तुमचे आंगी मुद्दा दस्तऐवजसुद्धां झाडून रोकड देखील साबीत करून देऊं, तुमच्यानें तर साबूत करवणार नाहीं, परंतु आमचे सरकारांत तुह्मांकडून जें अयोग्य झालें तें खरें करून देऊं, प्रस्तुतचा समय दोहीं दौलतीचा कसा आहे कीं दिवसेंदिवस एक एक कदम उभयपक्षीं पडत जावा, ह्मणजे दिलांतील गुबार झाडून निघोन प्रांजळ व्हावें, करारमदार झाले, त्यांजवर कायम रहावें, तें सर्व एकीकडे राहून लटके अंदेश काढीत बसून याची तकरार वाढविणें यांत संदेह वाढतील किंवा सफाई होईल, ज्या गोष्टीची तकरार कराल तीच गोष्ट वृद्धीस पावेल, दौलतीची बेहबूत कशांत हें पुर्ते समजून आह्मांशीं बोलावें, आह्मीं जें बोलाल त्याचा जवाब देण्यास हजर.