Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२३६] श्री.
विनंति विज्ञापना. अलीज्याह बहादूर धारूरचा घाट उतरून पिपळनेर प्रांत बीड तालुके सरवरजेंग येथें गेले, याप्रमाणें एक वर्तमान. दुसरें, पिंपळनेराहून कुच करून शाहगडानजीक गंगातीरीं दाखल जाल्याचें वर्तमान. अवरंगाबाद नजीक, सबब तेथील शहरचे तमाम लोक यांची चीजवस्त असा व लांबवालांबव करून सडेजरा रहातात. याप्रमाणें अवरंगाबाद येथील अखबारी वर्तमान आहे. वाहलोलखान सुभे यांच्या अर्जाही येतच आहेत. सदाशिव रड्डी घाटानजीक चोरआंर्बे येथें आपले जमीयतसुद्धां अलाहिदा उठून होता. इसमीयाचें त्याचें बोलणें होत होतें. हे एक खबर सांप्रत ऐकण्यांत कीं सदाशिव रड्डी इसामीयास समागमें घेऊन अलीज्याह ह्याशीं गेला. याप्रमाणें नित्य नवें एक एक वर्तमान येतें. तहकीक मागाहून समजेल त्याप्रमाणें विनंति लिहिण्यांत येईल. र।।. छ १२ माहे र।।खर. हे विज्ञापना.