Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२१५] श्री. १७ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याह बहादूर जमीयतसुद्धां उदगीर तालुक्यांत होते. तेथून कुचदरकुच कसबे रेणापुरानजीक मौजे मोटेगांव प।। बरदापूर येथें गेले, याप्रमाणें वर्तमान आहे. मुसारेमू व घासीमिया वगैरे सरदार भातांब-यानजीक शिवणीकशीनें येथें वंजरा ऐलतीरीं आहेत. मीरअलम इंग्रजी पलटणासमवेत जाऊन षामील झाले. वंजरा नदीस पाणी, सबब उतरून जाण्याचा अटकाव, याची तजवीज होत आहे. अलीज्याह जमीयतसुद्धां बरदापूर तालुक्यांत, त्यांशीं याशीं फासक तीस बत्तीस कोसांचा. याप्रमाणें वर्तमान आलें, पुढें होईल त्याची विनंति लिहिण्यांत येईल. बरदापूर तालुकियांतून धारारूस अलीज्याह जाणार ऐशी वार्ता आहे. तिकडील तालुक्यांत ठाणीं बसवून धामधूम व हंगामा याचे बोभाट येतात. स्वार पयेदळ मिळोन जमीयत वीस हजारपावेतों. अलीज्याह यांजपाशीं. याप्रमाणें खबर आहे. र।। छ ३ र।।खर हे विज्ञापना.