Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२१९] श्री. १७ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. इसामिया नबाबाकडे बेदराहून अलीज्याह कुच करून गेले, तेसमयीं येऊन वर्तमान सांगितलें. अलीज्याह यांजकडील व सदाशिवरड्डीकडील कोणी बोलावयास आले होते, त्यांचाही मजकूर नबाबाशीं बोलून येथून नबाबांनीं मागतीं इसीमिया यास तिकडे रवाना केलें, मुसारेमू वगैरे सरदार ज्या जागीं तेथें इसामिया गेले. तिकडील बोलणार कोणी आले, त्यांशीं यांशीं बोलणें होऊनं अलीज्याह यांनीं इसामियास येण्याविषयीं सांगोन पाठविलें. त्यावरून इसामिया पन्नास स्वारसुद्धां अलीज्याह यांचे लष्करांत गेले. त्यांनीं इसामियास अटकाविलें ह्मणून वर्तमान आहे. तथ्य खबर अद्याप कळली नाहीं. समजलियावर लिहींन. र।। छ ३ र।।खर. हे विज्ञापना.