Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२१६] श्री. १७ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. मोगल अल्ली हुमायूज्याह बेदरचे किल्ल्यांत कैदेंत होते, त्यांजला हैदराबादेस घेऊन येण्याकरितां नवाबांनीं शेख उमरखान यास बेदरास समागमें पालख्या, रथ, म्याने वगैरे सरंजाम देऊन पाठविलें. खानमजकूर तेथें पोंहचून मोगल अल्ली त्याचे मुलें माणसांसुद्धां घेऊन हैदराबादेस आले. त्यास इस्तकहाल मीर धोकदअल्ली शिकंदरज्याह साहेबजादे यांस पाठविलें. छ ३० र।।वल बुधवारीं मोगल अल्लीज्याह यांची मुलाजमत जाली. प्रथम दर्शनीं मोगलअल्ली नबाबापाशीं येतांच कदमबोस झाले. तेसमयीं नबाबास त्यांस उभयतांसही प्रेम व अश्रुपात क्षणभर होऊन मोगलअल्ली यांनीं पांच पुत्रांसहित नजर केली. नबाबांनी जवाहीर मोत्याच्या कंठ्या तीन व जिगा, कलगी, सरपेंच, तुरा, भुजबंद, दस्तबंद वगैरे अकरा आदाब इनांयत केले. हुमायून-ज्याह यास पेशजी गोलकुंड्यास पाठविलें होते, तेसमयीं त्यांचें जवाहीर वगैरे सरंजाम आणून जवाहीरखान्यांत दाखल केला होता. तें जवाहीर सांप्रत त्यास इनायत झालें, ऐशीही बोलवा आहे. दोनतीन घटका एकांतीं त्यांशीं बोलणें होऊन भोजन एकत्र झालें. रुखसत दिली. त्यांची हवेली पेशजी रहावयाची झाडून अगोदर नीट करविली होती. त्याजागीं जनान्यासुद्धां जाऊन राहिले. फकीर फुकरायांस खैरात करण्याकरितां नबाबांनीं ऐवज त्यांचकडे पाठविला. त्याची खैरात झाली. र।। छ ३ र।।खर. हे विज्ञापना.