Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२१७] श्री. १७ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. घनपु-याचा किल्ला मीर इमाम यानें पेशजी घेऊन शिंबंदी ठेविली होती. असदअल्लीखान त्या किल्ल्यास जमीयतसुद्धां लागून घनपु-याचा किल्ला घेतला. रुकमारड्डी व रामरड्डी वगैरे चार जमादार कोसगी, कांडगल, तांडूर वगैरे महालचे, यास कौल देऊन असद अल्लीखान याणीं आणिलें. त्याजला कैद करून खान, मजकूर जमीदारांस समागमें घेऊन हजार स्वारसुद्धा निघोन हैदराबादेस छ १ र।।खरीं आले. नवाबाची मुलाजमत झाली. जमीदार हस्तगत केले. यावरून असद अल्लीखान याजवर मर्जी संतोष झाली. मुलाजमतीचे समयीं कंठी व सरपेंच इनायत केला, असद अल्लीखान यास जमीयतसुद्धां अलीज्याह यांचे ताकुबावर रवाना करावें याचाही विचार होत आहे. होईल त्याची विनंति लिहिण्यांत येईल. र।। छ ३ माहे र।।खर. हे विज्ञापना.