Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२१८] श्री. १७ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याह बहादूर याणीं व-हाड प्रांतीं कोणी आपल्याकडील सरदार जमीयतसुद्धां पाठवून ठाणी बसवावयाचे सांगितलें. त्याप्रमाणें सरदार जमावसुद्धां व-हाडचे तालुक्यांत जाऊन कित्येक ठाणीं घेतलीं, व हंगामा शुरु केला. याचे बोभाट जागीरदार व आमिलाकडून नबाबाडे आले. त्यावरून तमाम जागीरदारास व वजीरखान वगैरे त्या प्रांतीचे सरदारांस इनायतनामे रवाना व्हावयास तयार झाले कीं, सर्वत्रानीं एकत्र होऊन अलीज्याकडून कोण ठाणीं बसवावयास आला त्याचा दखल न होतां तंबी करावी. याप्रमाणें पत्रें तयार झालीं. राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुमा यांसही पत्र तयार झालें आहे कीं इकडील सरदारांशीं तुह्मांकडील जमीयत अनुकूल होऊन एक विचारें बंदोबस्त करावा. र।। छ ३ र।।खर हे विज्ञापना.