Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१६५] श्री. १३ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. साहुकार चार कमानवाले व करवानवाले यांस रोषनराव यांचे मार्फात हुकूम जाला जेः–सरकारांतून चाळीस लक्ष रुपयांचे होन टिपूकडील बाहदुरी वगैरे दर पावणे चार रु।।प्रो।। व आदवानीचे होन साडेतीनप्रो। खरेदी करून नगद ऐवज ज्यास देवण्यांत येईल त्यास देत जाणें ; त्यास, हल्लीं बाजारांत होनाचा भाव टिपुशाई दर तीन रुपये नऊ आणे साडे तीन प्रो।, त्यास तेाटा दर होनीं तीन आणे चार आणेप्रो। बसतों, व आदवानीचे होनाचा निरख तीन रुपये प्रो। असतां साडेतीन भावानें दिल्हे. सबब दर होनीं आठ आणे रोज नुकसान. साहुकारांनीं दोन तीन तट खाल्ला. परंतु मान्य जालें नाहीं. सदरहूप्रो। होनाचा भाव ज्यारी करणें येविशीं आज्ञा. त्यावरून कबूल केलें. चाळीस लाखांची तफरीफ इसमनवेसिवार करून होन देविले. र॥ छ २८ सफर. हे विज्ञापना.