Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१४५] श्री. ३१ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. मुसारेमू वगैरे सरदार कुहिरापलीकडे दोन कोस प्रथम जाऊन राहिले. ते जागा पाणी कमी व तळ वाईट समजोन माघारे दोन कोस चांगले जागा व पाणी पाहून उतरले. हें वर्तमान नवाबाकडे आल्यानंतर पुढें गेले, ते माघारे काय समजोन आले ह्मणून मर्जी बहुत खपा होऊन इनायतनामे रवाना झाले कीं, पत्र पावतांच पुढें ज्या जाग्यावर गेला होता, त्याचे समीप अघाडीस जागा पाणी पाहून उतरणें. याप्रमाणें हुकूम गेला. र।। छ १५ माहे सफर. हे विज्ञापना.
छ १८ माहे सफर, मु॥ भागानगर, रवाना टप्यावर.