Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१४४] श्री. ३१ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. रायराया रेणूराव धोंडाजी याजकडे करडखोप तालूका नवाबाकडून जमीयतीचे सरंजामांत, होता. तेथें याजकडून आमीलापाशीं पन्नास साठ घोडीं बारगीर व शिबंदी प्यादे होते. पैकीं तीस बारगीर घोडीसुद्धां जमातदार पेशजी अलीजाहा याजकडे जाऊन मिळाला, याची विनंति लिहिण्यांत आलीच आहे. हल्लीं अलीजाहाकडील जमीयत करडखेापास जाऊन जमीदाराचे फितुरानें करडरोष घेतलें. वर्तमान नवाबाकडे व रायाजीस आलें. निळंग, निटूर, हुलसूर, लोहारेंपर्यंत अलीजाहा याजकडील ठाणीं बसलीं. याप्रमाणें वर्तमानें आलीं व येतात. र।। छ १५ माहे सफर. हे विज्ञापना.