Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[८०] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐसीजे. कदाचित् स्वामीचे मनांत येईल कीं, नवाबाचे बोलण्याचें प्रमाण शाश्वत काय मानावें ? खरड्यावर करार मदार केले, पैक्याचा निर्गम येथें होणार नाहीं, हैदराबादेस यावर तजवीज करण्यांत येईल, ह्मणून तुह्मी नवाबाचे तर्फेनें खातरजमा केली. तुह्मांस , नवाबांनीं लौकर बोलाविलें तसे गेला. तुह्मांस पोंहचून एक महिना जाहला तोपर्यंत तुमचें पत्र कार्याचे दुरुस्तीचें नाहीं. तेव्हां शाश्वत कसें मानावें ह्मणोन अंदेषा मनांत येईल. तर येऊं नये. नवाब आपले करारमदारावर कायम आहेत. दोन चार वेळ खातरजमेनें मशीं बोलिले. पैक्यावेगळीं जीं कामें तीं सर्व उगवून घ्यावीं, विलंब करूं नये. पुढें अमल ज्यारी करावयाचे त्यास हरकत न व्हावी. ज्यारी करावें याविषयीं राजे रेणूरावजी यांस सांगून निक्षून ताकीद झाली. जशीं कामें उलगडून येतील तशीं लिहून पाठवीन. पैक्याचा प्रकार राहिला त्याचीही तरतूद करतों. असें हजरतीनीं सांगितलें. मागाहून नवाबास पुसून लवकरच लिहून पाठवितों. याविषयी अंदेषा घेऊन प्रस्तुतचे तदबिरीविषयीं नवाबांनीं लिहिलें यास विलंबावर न टाकावें. दौलतसंबंधाशीं आणि घराऊरीतीशीं ऐक्यता करून यांतील त्यांत त्यांतील यांत असें होऊं नये. दौलतसंबंधीं करार मदार अमलात आले त्याप्रमाणें होतच आहेत. राहवयाचे नाहींत. प्रस्तुत नवाबानीं घराऊरीतीनें तदबीर पुसली. याचें उत्तर जें उचीत नवाबाची खातरजमा व्हावी असें यावें. या समयांत नवाबास दुःख न व्हावें हें करणें स्वामीकडे. र।। छ ६ माहे मोहरम. हे विज्ञापना.