Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[७९] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐसीजे. नवाबानीं इरषाद केला कीं, अलीज्याह यास बावली देऊन सदाशिव रड्डी घेऊन गेला, ही गोष्ट नालायक केली, याचा तदारुक जमीदार मजकूर यास करावयाचा, कदाचित् राव पंत प्रधान यांचे तालुकियांतील लोक नौकरीच्या इराद्यानें बोलावितील तर जाऊं नयेत, या इतल्याचीं पत्रें श्रीमंत व मदारुलमहाम यांस पाठविलीं तीं तुह्मीं रवाना केलींच आहेत, त्याचा जवाब बसवावच येईल, दोहीं दौलतीची यगानगत पेषजीपासून चालत आली, तेव्हां एका दौलतीवर कांहीं एक विचार येऊन वारद झाला तर त्याचे परिहाराची तदबीर दुतर्फाचे विचारें होत आली. खुसूस रघुनाथराव यानीं नामुनासीब हरकत करून नारायण रावसाहेब यांस दगा केला, ही गोष्ट नालायक झाली, त्यावेळेस कैलास वासी बाळाजीराव यानीं हिनयांत असतां आह्माकडे अज्राहे खानगी सांगून पाठविलें होतें त्याचें स्मरण झालें जे, जमाना एकसा नाहीं, कोणे वेळेस काय होईल याचा भरंवसा मानूं नये, या दोहीं दौलतीचे इरादे एकास एकानीं बिलकुल उखडून टाकावे असे नाहींत, बिरादरीसारखी चाल उभय दौलतीची आहे, कांहीं एका दिवसां माझे घरांत बखेडा आहे, याजकरितां हेंच सांगणे जे, आतां उभय दौलतीची यगानगत आहे याचें स्मरण ठेवून आमचे वंशाचें बरें तें करावें, तें स्मरण होऊन मनांत आलें जे, बाळाजीराव काय दुरंदेष होते? पुढें भविष्य होणार त्याची सूचना पूर्वींच ज्यांनीं केली ऐसे पल्याचे अंदेषे मनांत यावें ही दानाई ईश्वरानीं ज्यास बक्षीस केली, त्यांचे सखुनाची पास ठेवणें लाजीम या विचारांत होतों, तेवेळेस गंगाबाई यांस मदारुलमहाल यांनीं पुरंधरास नेलें, आह्मांस इतला दिला, आणि आमचे मदतीची इच्छा केली, दौलतीचे मार्गानें पाहतां कोणतेंही कर्म करणें तर त्यास तोरा असणें शर्त आहे, तेसमयीं गंगाबाई गरोदर होती, इतकीच उमेद, पुढें काय होईल हा भरंवसा नाहीं, तथापि बाळाजीराव यांचे सखुनाचें स्मरण करून खुदावर तवकूल ठेवून रघुनाथराव यांचे तंबीचा इरादा केला, आमची नियत ईश्वरास मान्य होऊन माधवराव पंतप्रधान याचा तवलूद झाला, जें मनांत होतें तें जनाब इलाहींत कबूल होऊन हे दिवसं दृष्टीस पडले, आतां एक हउस राहिली आहे कीं, राव पंतप्रधान यांस पहावें ह्मणजे अति संतोष, त्यास ईश्वरइच्छेकडून हेंही लवकरच घडेल, बाळोजीराव यांनी आह्मांस यगानगतीचे मार्गे जें सांगून पाठविलें ती दोस्ती त्यांचे पाठीमागें आह्मीं आदा केली,